कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, आता नागरिकांना आरोग्य सेतु अॅपवरूनही तुमच्या लसीकरणाचं स्टेटस समजणार आहे. आरोग्य सेतू अॅपने ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. जर आपण लसीचा पहिला डोस घेतला असेल तर तुम्हाला एक टीक दिसून येईल. तर जेव्हा तुम्ही लसीचे दोन्ही डोस घ्याल त्यावेळी त्या ठिकाणी दोन निळ्या टीक दिसून येतील.दरम्यान, आरोग्य सेतू अॅपद्वारे आता लसीकरणाचं स्टेटस पाहता येणार असल्याची माहिती आरोग्य सेतू अॅपकडून ट्विटरद्वारे देण्यात आली. "तुमचं लसीकरण स्टेटस आता आरोग्य सेतू अॅपद्वारे अपडेट केलं जाऊ शकतं. यासाठी लस घ्या आणि ब्लू टीकसह ब्लू शिल्ड मिळवा," असं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. आरोग्य सेतू अॅप भारत सरकारनं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लाँच केलं होतं.
Aarogya Setu : आता आरोग्य सेतू अॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस, मिळणार ब्लू शिल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 17:47 IST
आरोग्य सेतू अॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस. अॅपद्वारे करता येते आपली लसीकरणासाठी नोंदणी.
Aarogya Setu : आता आरोग्य सेतू अॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस, मिळणार ब्लू शिल्ड
ठळक मुद्देआरोग्य सेतू अॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस. अॅपद्वारे करता येते आपली लसीकरणासाठी नोंदणी.