शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

आप म्हणजे 'करने मे झीरो, धरने मे हिरो'! भाजपाची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 12:18 IST

आम आदमी पक्ष म्हणजे 'करने मे झीरो, धरने मे हिरो,' अशी खरमरीत टीका

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली नायब राज्यपालांच्या निवास्थानी सुरू केलेल्या आंदोलनाला एकीकडे विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असतानाच भारतीय जनता पक्षाने मात्र आपच्या भूमिकेवर खरमरीत टीका केली आहे. आम आदमी पक्ष म्हणजे 'करने मे झीरो, धरने मे हिरो,' अशी खरमरीत टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि अधिकाऱ्यांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या असहकाराविरोधात अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या निवास्थानी सुरू केलेल्या आंदोलनाची नायब राज्यपाल यांनी अद्यापही दखल घेतलेली नाही, त्यामुळे वाद अधिकच चिघळला आहे. मात्र पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उभारणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपा नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी खरमरीत टीका केली आहे. 'आम आदमी पक्ष म्हणजे "करने मे झीरो, धरने मे हिरो'आहे. ''करना कुछ नही धरना सब कुछ"अशी त्यांची मानसिकता आहे,''अशी टीका नक्वी यांनी केली आहे. दिल्लीतील जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास ते धुळीस मिळवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

 दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलन करत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी धरणे आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र. या आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची रविवारी रात्री तब्येत बिघडली. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. सध्या त्यांना ग्लुकोज देण्यात येत आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बाकीच्या मंत्र्यांचे दैनंदिन रुटिन चेकअप सुरु आहे. रविवारी सकाळपासून सत्येंद्र जैन यांची तब्येत खालवली होती. तपासणी केली त्यावेळी त्यांचे वजन 78.5 किलो असल्याची नोंद होती. दरम्यान, सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा ट्विटवरुन दिली आहे. 

टॅग्स :AAPआपBJPभाजपाPoliticsराजकारणArvind Kejriwalअरविंद केजरीवाल