"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:47 IST2025-12-17T18:46:35+5:302025-12-17T18:47:15+5:30
Manjinder Singh Sirsa And AAP : दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपवर गंभीर आरोप केला आहे.

"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
देशाची राजधानी दिल्लीप्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसत नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे की, एअर क्वालिटी इंडेक्स ७०० च्या पार पोहोचला आहे. दिल्ली सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, परंतु त्यांचा अद्याप कोणताही ठोस परिणाम दिसून आलेला नाही. यावरुन राजकारण तापलं आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपवर गंभीर आरोप केला आहे.
मंत्री सिरसा यांनी आरोप केला आहे की, आम आदमी पार्टी दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळत आहे. त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघात 'आप'चे नगरसेवक विजय कुमार यांनी स्वतः कचरा पेटवून त्याचा व्हिडीओ बनवल्याचा दावा त्यांनी केला. "आप गलिच्छ राजकारण करत आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना रोखावं" असं म्हणत सिरसा यांनी हल्लाबोल केला आहे.
🛑 झूठ फैलाने के लिए किसी भी हद तक गिर सकते हैं फ्रॉड आपिए 👇
— BJP Delhi (@BJP4Delhi) December 17, 2025
प्रदूषण पर आम आदमी पार्टी की खुली पोल, अपने ही फैलाए झूठ में फंस गए आपिये, सौरभ भारद्वाज जी ब्लेम गेम खेलने से पहले अगर थोड़ा होमवर्क कर लेते, तो यह भी पता चल जाता कि जिस जगह का रोना रोया जा रहा है, वहाँ से AAP का ही… pic.twitter.com/QScBp7229v
"जाणीवपूर्वक कचरा जाळताहेत"
दिल्ली भाजपाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत 'आप'वर निशाणा साधला आहे. "खोटं पसरवण्यासाठी 'आप'चे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. प्रदूषण वाढवून दिल्ली सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांचे नगरसेवक जाणीवपूर्वक कचरा जाळत आहेत. सौरभ भारद्वाज यांनी 'ब्लेम गेम' खेळण्यापूर्वी थोडा अभ्यास केला असता, तर ज्या ठिकाणावरून ते ओरडत आहेत, तिथे त्यांचाच नगरसेवक असल्याचं त्यांना समजलं असतं" अशी टीका भाजपाने केली आहे.
दिल्लीत प्रदूषणाची चार मुख्य कारणं
पर्यावरण मंत्री सिरसा यांनी आगामी काळातील आव्हानांबाबत माहिती देताना सांगितलं की, "मागील आकडेवारी पाहता येणारा आठवडा दिल्लीसाठी कठीण असेल. मात्र, आम्ही सातत्याने काम करत आहोत. दिल्लीत प्रदूषणाची चार मुख्य कारणं आहेत, ती म्हणजे वाहनांमुळे होणारं प्रदूषण, धुळीमुळे होणारं प्रदूषण, घनकचऱ्यामुळे होणारं प्रदूषण आणि औद्योगिक प्रदूषण. सरकारने ६२ 'हॉटस्पॉट' निश्चित केले असून तिथे वेगाने काम सुरू आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी गुगल मॅप्स आणि 'मॅप इंडिया'ची मदत घेतली जाणार आहे असंही सिरसा यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Delhi minister Manjinder Singh Sirsa says, "...A major survey is underway in Delhi. We are conducting this survey through all the District Magistrates, targeting illegal industries... We are also in touch with neighboring states... We are ensuring that the AQI (Air… pic.twitter.com/sm2bYip2Fz
— ANI (@ANI) December 17, 2025