शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'आप'च्या आमदारांची बाजू ऐकून घ्या; न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 15:56 IST

'ईडी'च्या शिफारसीवरून राष्ट्रपतींनी 'आप'च्या या आमदारांना लाभाची पदे भुषविल्याच्या आरोपावरून अपात्र ठरवले होते.

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालामुळे निवडणूक आयोगाकडून अपात्र ठरवण्यात येणाऱ्या आम आदमी पार्टीच्या (आप) 20 आमदारांना मोठा दिलासा मिळाला. हा निकाल देताना न्यायालयाने राष्ट्रपतींची अधिसूचना रद्द ठरवत अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) 'आप'च्या आमदारांची बाजू पुन्हा ऐकून घेण्याचे आदेश दिले. 'ईडी'च्या शिफारसीवरून राष्ट्रपतींनी 'आप'च्या या आमदारांना लाभाची पदे भुषविल्याच्या आरोपावरून अपात्र ठरवले होते. मात्र, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती चंदर शेखर यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्दबातल ठरवला. अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने आमची बाजू ऐकूनच घेतली नाही. हे आमच्या नैसर्गिक हक्काचे उल्लंघन असल्याचे आपच्या आमदारांचे म्हणणे होते. न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत निवडणूक आयोगाला या आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे या आमदारांचे विधानसभा सभागृहातील स्थान कायम राहणार आहे. केजरीवाल सरकारसाठी ही मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. 'आप'च्या आमदारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, कंत्राटी तत्त्वावर असलेल्या कामगारांनाही गैरवर्तनाच्या आरोपाखाली पूर्ण चौकशी केल्याशिवाय पदावरून दूर केले जात नाही. मात्र, आम्हाला कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देताच अपात्र ठरवण्यात आले, असे या आमदारांनी याचिकेत म्हटले होते.न्यायालयाच्या या निर्णयानंतर 'सत्याचा विजय झाला,' असे टि्वट आपचे संयोजक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. सत्याचा विजय झाला आहे. दिल्लीच्या लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीकरांना न्याय दिला आहे. हा दिल्लीकरांचा मोठा विजय आहे, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :AAPआपBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयElectionनिवडणूक