Aadhaar Card: जाणून घ्या, यापुढे कुठे आवश्यक आणि कुठे अनावश्यक असेल आधार कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 12:24 PM2018-09-26T12:24:59+5:302018-09-26T12:31:06+5:30

आधार वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Aadhaar Verdict: Aadhaar Card Check Where it is mandatory | Aadhaar Card: जाणून घ्या, यापुढे कुठे आवश्यक आणि कुठे अनावश्यक असेल आधार कार्ड

Aadhaar Card: जाणून घ्या, यापुढे कुठे आवश्यक आणि कुठे अनावश्यक असेल आधार कार्ड

Next

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं आज आधार कार्डबद्दल महत्त्वाचा निर्णय दिला. आधार कार्ड वैध असल्याचा निकाल न्यायालयानं दिला. केंद्र सरकारनं कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. मात्र यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आज सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला. यापुढे आधार कार्ड कोणत्या कामांसाठी अनिवार्य असेल आणि नसेल, याबद्दही न्यायालयानं भाष्य केलं. 

कुठे आवश्यक?
- पॅन कार्ड तयार करण्यासाठी
- आयकर भरण्यासाठी 
- सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी
- सरकारकडून मिळणाऱ्या अनुदासानासाठी

कुठे आवश्यक नाही?
- मोबाईल सिमसाठी
- बँक खात्यासाठी
- शाळा, महाविद्यालयातील प्रवेशासाठी
- सीबीएसई, नीट, यूजीसी परिक्षांसाठी
- 14 वर्षांखालील मुलांकडे आधार नसल्यास त्यांना केंद्र आणि सरकारच्या योजनांचा लाभ मिळेल. त्यांना योजनांच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही
- खासगी कंपन्या आधार कार्ड मागू शकत नाहीत
 

Web Title: Aadhaar Verdict: Aadhaar Card Check Where it is mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.