तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:45 IST2026-04-06T15:45:34+5:302026-04-06T15:45:59+5:30

'शोले' चित्रपटातील वीरूची आठवण करून देणाऱ्या या घटनेमुळे बरखेडा गावात एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

A young woman's 'Sholay' style drama! What happened when a young woman climbed a mobile tower and threatened her family? | तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?

AI Generated Image

राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाच्या लग्नावरून भररस्त्यात फिल्मी थरार पाहायला मिळाला. आंतरजातीय विवाहाचा हट्ट धरलेल्या एका तरुणीने, घरच्यांचा विरोध पाहून थेट मोबाईल टॉवरचे टोक गाठले. 'शोले' चित्रपटातील वीरूची आठवण करून देणाऱ्या या घटनेमुळे बरखेडा गावात एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

जातीच्या भिंतीमुळे संसाराची स्वप्नं धुळीला?

मिळालेल्या माहितीनुसार, बरखेडा गावातील ही तरुणी गावातीलच एका तरुणावर जीवापाड प्रेम करते. मात्र, दोघांच्या जाती वेगवेगळ्या असल्याने मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. वारंवार विनवणी करूनही घरचे ऐकत नसल्याचे पाहून हताश झालेल्या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आणि रागाच्या भरात मोबाईल टॉवरवर चढली.

प्रियकराला बोलावलं, गावात हायव्होल्टेज ड्रामा

तरुणी टॉवरच्या वरच्या टोकावर बसल्याचे दिसताच ग्रामस्थांची पाचावर धारण बसली. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. बयाना सदर पोलीस आणि नागरी संरक्षण दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तरुणी खाली उतरायला तयार नसल्याने पोलिसांनी अखेर तिच्या प्रियकरालाही घटनास्थळी बोलावले. "माझं लग्न याच मुलाशी लावून द्या, नाहीतर मी खाली येणार नाही," अशी एकच रट तिने लावून धरली होती. खाली उभा असलेला प्रियकरही तिला ओरडून खाली उतरण्याची विनवणी करत होता.

दोन तासांच्या थरारानंतर सुटकेचा निःश्वास

टॉवरखाली शेकडो लोकांची गर्दी जमा झाली होती आणि वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते. सुमारे दोन ते तीन तास हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. अखेर पोलीस आणि बचाव पथकाने तिला लग्नाबाबत योग्य मार्ग काढण्याचे आणि सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर तरुणी शांत झाली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिला टॉवरवरून खाली उतरवले, तेव्हा कुठे गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Web Title : अंतरजातीय विवाह के लिए लड़की का 'शोले' स्टाइल ड्रामा, टावर पर चढ़ी।

Web Summary : राजस्थान में अंतरजातीय विवाह का विरोध होने पर एक लड़की मोबाइल टावर पर चढ़ गई। पुलिस और ग्रामीणों ने दो घंटे बाद उसे मनाया, समाधान का वादा किया। भारी हंगामा हुआ।

Web Title : Girl climbs tower in 'Sholay' style drama over inter-caste marriage.

Web Summary : Rajasthan girl, protesting family's inter-caste marriage opposition, climbed a mobile tower. Police and villagers persuaded her down after a two-hour standoff, promising resolution. High drama ensued.