'दो शादी करेंगे, दो शादी...', खुर्च्या फेकल्या, मोबाइल फोडला, विवाहितेचा हायव्होल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 09:13 IST2023-04-01T09:11:25+5:302023-04-01T09:13:31+5:30

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली.

A young woman stormed the police station shouting 'Do Shaadi Karenge, Do Shaadi Karenge' | 'दो शादी करेंगे, दो शादी...', खुर्च्या फेकल्या, मोबाइल फोडला, विवाहितेचा हायव्होल्टेज ड्रामा

'दो शादी करेंगे, दो शादी...', खुर्च्या फेकल्या, मोबाइल फोडला, विवाहितेचा हायव्होल्टेज ड्रामा

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली. एक विवाहिता नववधूच्या पेहरावात पोलिस स्थानकात पोहोचली आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांसमोरच ‘दो शादी करेंगे, दो शादी करेंगे’ असे ओरडत धिंगाणा घातला. तिनेने खुर्च्या फेकल्या, मोबाइल फोडला आणि जमिनीवर आडवे होऊन हाय व्होल्टेज ड्रामा केला. तिच्यावर नियंत्रण मिळवताना पोलिसांनाही नाकी नऊ आले होते. अखेर महिला पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तिला सासर व माहेरच्या लोकांच्या ताब्यात देण्यात आले. 

पोलिस स्थानकात वरिष्ठ अधिकारी पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी बसेला गावच्या अनिल शर्मा यांची पत्नी काजल तेथे आली. १८ फेब्रुवारीला मर्जीविरुद्ध लग्न लावून दिले; पण प्रियकर गुड्डूसोबत लग्न करायचे आहे, असे ती म्हणाली आणि पोलिसांकडून दुसऱ्या लग्नाची परवानगी मागत धिंगाणा घालायला लागली. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Web Title: A young woman stormed the police station shouting 'Do Shaadi Karenge, Do Shaadi Karenge'