रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:18 IST2025-06-28T14:18:25+5:302025-06-28T14:18:58+5:30
Crime News: मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एका रिक्षाचालकाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे थेट अमेरिकेतून भारतात तक्रार आल्याची आणि त्यानंतर पोलिसांनी या रिक्षाचालकाला अटक केल्याची घटना समोर आली आहे.

रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...
मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एका रिक्षाचालकाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे थेट अमेरिकेतून भारतात तक्रार आल्याची आणि त्यानंतर पोलिसांनी या रिक्षाचालकाला अटक केल्याची घटना समोर आली आहे. इंदूर येथील या ६० वर्षीय रिक्षाचालकाला मध्य प्रदेशच्या सायबर सेलने चाइल्ड पोर्नोग्राफीच्या प्रकरणात अटक केली आहे. आरोपी रिक्षाचालकाचं नाव इरशाद असं असून, तो खरजाना येथील रहिवासी आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलांचा अश्लील व्हिडीओ शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अमेरिकेत असलेल्या व्हॉट्सअॅप इंकने भारत सरकारच्या सायबर टिपलाईनकडे एक तक्रार पाठवली होती. ही तक्रार चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेन्ट डाऊनलोड आणि शेअर करण्यासंदर्भातील होती. तसेच यामध्ये सदर रिक्षाचालकाचा सहभाग असल्याचे दिसून आले होते. हा रिक्षाचालक व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडीओ डाऊनलोड करून ते शेअर करत होता, असा आरोप आहे. या संदर्भातील माहिती गृहमंत्रालयाच्या सायबर युनिटने इंदूरच्या राज्य सायबर विभागाला दिली.
त्यानंतर इंदूर येथे राज्य सायबर सेल ठाणे पोलिसांनी व्हॉट्सअॅप इंक युनायटेड स्टेटकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर खरजाना परिसरातील एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडील मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. आरोपी रिक्षाचालक अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर चाईल्ड पोर्न व्हिडीओ शेअर करत होता, असा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच यंत्रणांनी त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून पाळत ठेवली होती. अखेरीस त्याला अटक करण्यात आली.