प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', चालत्या बुलेटवर उलटी बसून तरूणीनं केला 'कहर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:10 IST2023-05-30T13:09:56+5:302023-05-30T13:10:29+5:30
प्रेमी युगुलाचा चालत्या बुलेटवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', चालत्या बुलेटवर उलटी बसून तरूणीनं केला 'कहर'
Stunt Viral Video : हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल आणि कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियावर नेहमी भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. रील्स बनवून प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरूणाई कोणत्याही थरार जाते. अशातच एका प्रेमी युगुलाचा चालत्या बुलेटवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशातील लखनौ येथील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून नेटकरी या प्रेमी युगुलावर निशाणा साधत आहेत. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, तरूणी चालत्या बुलेटच्या टाकीवर उलटी बसून रोमान्स करत आहे. गाडीचा वेग देखील मृत्यूला आमंत्रण देणारा होता.
नवाबों का शहर #लखनऊ… अलीगंज के पास पास निराला नगर का पुल… जवानी का नशा और बुलेट बाइक… ये आशिक़ी का कौन सा सुरूर है जो जान की बाज़ी लगाने को तैयार है…@Uppolice सम्भालिए देश के कल को… pic.twitter.com/VA14TWdIJS
— Mamta Tripathi (@MamtaTripathi80) May 28, 2023
नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत असून कारवाईची मागणी करत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणारी ही जोडी स्वत:सह इतरांचे जीव धोक्यात टाकत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.