शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

चालक मोबाईल पाहत राहिला अन् ट्रेन गेली प्लॅटफॉर्मवर; मथुरेतील अपघाताचा व्हिडीओ viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 15:02 IST

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला.

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. या रेल्वे दुर्घटनेच्या संयुक्त तपास अहवालात चालक रेल्वे चालवताना मोबाईल फोनवर काहीतरी पाहत असल्याचे समोर आले आहे. तसेच तो सौम्य नशेच्या अवस्थेत होता, असेही तपास अहवालात नमूद करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चालकाच्या चुकीमुळे ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली होती.

माहितीनुसार ही चूक 'क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टिम'च्या माध्यमातून उघड झाली. रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सर्व प्रवासी खाली उतरले, असे त्यात म्हटले आहे. यानंतर रेल्वे कर्मचारी सचिन त्याच्या मोबाईलवर काहीतरी पाहत असताना ट्रेनच्या इंजिनमध्ये पोहोचला. त्याने आपली बॅग इंजिनच्या एक्सलेटरवर ठेवली आणि त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहू लागला. बॅगेच्या दाबामुळे एक्सलेटर पुढे सरकले आणि ट्रेन पुढे जाऊ लागली अन् हा अपघात झाला. 

मंगळवारी घडला विचित्र अपघातमथुरा जंक्शनवर शकूरबस्ती-नवी दिल्ली-मथुरा शटल ईएमयू ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इंजिन प्लॅटफार्मवर येताच प्लॅटफार्मवरील प्रवासी पळून गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी आधीच उतरले होते. मंगळवारी रात्री १०.५५ च्या सुमारास लोको पायलट इंजिन बंद करून ते पार्क करत असताना हा अपघात झाला. या अपघातातील मोठी बाब म्हणजे प्लॅटफॉर्मवर रेल्वे इंजिनच्या प्रवेशापासून काही अंतरावर ओएचई लाईनचा पोल लावण्यात आला होता, त्यामुळे ट्रेनचे इंजिन त्यावर आदळले आणि थांबले. जर ओएचई लाईनचा पोल नसता तर प्लॅटफॉर्मवर ट्रेन किती प्रमाणात धावली असती आणि किती लोकांना त्याचा फटका बसला असता याचा अंदाज लावता आला नसता. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmathura-pcमथुराrailwayरेल्वेAccidentअपघात