राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 19:53 IST2024-07-01T19:52:58+5:302024-07-01T19:53:40+5:30

राजस्थानमधील करौली जिल्ह्यात बोलेरो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत २ मुले आणि ६ महिलांसह ९ जणांचा मृत्यू झाला. तर बोलेरोमधील चार जण जखमी झाले आहेत.

A terrible accident in Rajasthan Bolero-truck collision 9 people died | राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थान येथील करौली जिल्ह्यात बोलेरो आणि ट्रक यांच्यात धडक झाली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी पाच वाजता झाला. 

अपघाताची माहिती मिळताच करौलीचे जिल्हाधिकारी नीलाभ सक्सेना, एसपी ब्रिजेश ज्योती उपाध्याय, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजवीर सिंह चौधरी, करौली कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील सिंह आणि वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन जिल्हा रुग्णालयात पोहोचले. अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली आहे.

तर मृतांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बोलेरोमधील सर्व लोक कैला देवी मातेच्या दर्शनासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे. करौली येथून ट्रक जात असताना. मृतांपैकी बहुतांश मंद्रयाल उपविभाग आणि मध्य प्रदेशातील खिरखिन गावातील रहिवासी आहेत. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यानंतर लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Web Title: A terrible accident in Rajasthan Bolero-truck collision 9 people died

टॅग्स :Accidentअपघात