शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"मी खूप विचार केला पण...", आई-वडिलांना न रडण्याचं आवाहन; विद्यार्थ्यानं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 17:49 IST

मागील काही कालावधीपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

अभ्यासामुळे आलेले नैराश्य, वाढलेली स्पर्धा आणि ताण यामुळे मागील काही कालावधीपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील उदयपूर शहरात गुरूवारी रात्री एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृत विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती. ज्यात लिहिले आहे की, मम्मी आणि पप्पा, कृपया मला माफ करा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. एकुलता एक मुलगा हर्षवर्धनने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजात कुटुंबीयांना टाहो फोडला.

तो शिक्षणासाठी घरापासून लांब राहत होता. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत त्याने आत्महत्या करून जीवन संपवले. ही घटना उदयपूर शहरातील बारागाव पोलीस स्टेशन परिसरात घडली. राजसमंद जिल्ह्यातील देवगड येथील रहिवासी असलेला हर्षवर्धन विद्या भवन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. हर्षवर्धन ११ फेब्रुवारीला घरी गेला होता आणि १४ फेब्रुवारीला कॉलेजला परतला होता. त्याने घरातून परतताना वडिलांना उर्वरित १५,००० रुपये कॉलेजची फी भरण्यास सांगितले होते.   मृत हर्षवर्धनच्या खोलीजवळ राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने रात्री हर्षवर्धनच्या खोलीचा दरवाजा ठोठावला मात्र बराच वेळ झाला तरी त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांने वॉर्डनसह इतर विद्यार्थ्यांना याची माहिती दिली. सर्वांनी दरवाजा तोडून आत गेल्यावर हर्षवर्धन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

आई-वडिलांना न रडण्याचं आवाहनविद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक बडगाव पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. यानंतर मृत विद्यार्थ्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यामध्ये हर्षवर्धनने लिहिले की, मम्मी, मरण्यापूर्वी मी खूप विचार केला, पण आता हे सगळं बघून मला काही कळत नाहीये. आता मला कॉलेजची फी भरावी लागेल, मला माहीत आहे. १५,००० रुपये भरणं ही मोठी गोष्ट नाही. पण मी तुझ्या अपेक्षेनुसार जगू शकलो नाही. माझ्यानंतर नेतलचे चांगले शिक्षण आणि लग्न करायचं हे माझं स्वप्न होतं, पण इच्छा असूनही मी ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही. आई-बाबा कोणीच रडू नका कारण माझी तेवढी पातळी नाही. आता तुम्हा लोकांची अवस्था बघणे मला सहन होत नाही. आता मी थकलो आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. मला माफ करा.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी