चोरीची अजब घटना; महिला चोरांनी 9 सोन्याचे मणी खाल्ले, Video पाहून पोलिसही चक्रावले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 14:27 IST2022-11-18T14:26:03+5:302022-11-18T14:27:29+5:30
आजकाल चोर चोरीच्या नवनवीन शक्कल लढवत असतात. असाच प्रकार एका सोन्याच्या दुकानात घडला आहे.

चोरीची अजब घटना; महिला चोरांनी 9 सोन्याचे मणी खाल्ले, Video पाहून पोलिसही चक्रावले...
आजकाल चोर सोन्याच्या दुकानात चोरी करण्याच्या नवनवीन शक्कल लढवत असतात. कधी महिलांच्या मदतीने चोरी केली जाते, तर कधी लहान मुलांची मदत घेतली जाते. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये चोरीचे एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. दोन महिलांनी सोन्याच्या दुकानात अतिशय चतुराईने चोरी केली, पण त्यांची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली.
मेरठमधील एका सोनाराच्या दुकानात दोन महिला खरेदीच्या बहाण्याने आल्या, सोनाराने त्यांना सोन्याचे मणी दाखवले. यावेळी सोनाराची नजर चुकवून त्यांनी 9 सोन्याचे मणी तोंडात टाकले. वीरेंद्र रस्तोगी असे या सोनाराचे नाव असून, त्यांच्या मेरठमधील उज्ज्वल ज्वेलर्स नावाच्या दुकानात ही चोरी झाली आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या दुकानात दोन महिला सोन्याचे मणी घरेदी खरेदी करण्यासाठी आल्या.
दुकानदाराने वेगवेगळ्या डिझाईन्सचे मणी त्यांना दाखवले. यावेळी त्या महिलांनी वीरेंद्र यांची नजर चुकवून 9 मणी तोंडात टाकले आणि मणी न आवडल्याचा बहाणा करत दुकानातून पोबारा केला. यानंतर वीरेंद्र यांना काही मणी कमी असल्याचे जाणवले, त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.