सुट्टीवर आलेल्या जवानाने पत्नी अन् मुलीला जिवंत जाळले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 10:20 IST2023-07-07T10:20:30+5:302023-07-07T10:20:39+5:30

दहा वर्षांपूर्वी सोनलचा विवाह हिमांशू नामक युवकाशी झाला होता.

A soldier on leave burns his wife and daughter alive; Striking type in Rajasthan | सुट्टीवर आलेल्या जवानाने पत्नी अन् मुलीला जिवंत जाळले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

सुट्टीवर आलेल्या जवानाने पत्नी अन् मुलीला जिवंत जाळले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

मुजफ्फरपूर : राजस्थानमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानाने सुट्टीवर घरी आला असताना बुधवारी रात्री पत्नी आणि दोन महिन्यांच्या मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना बिहारच्या मुजफ्फरपूर येथे घडली. घटनेनंतर आरोपी जवान फरार झाला आहे. या घटनेत पत्नी सोनल प्रिया (३०) आणि दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.

मृत महिलेच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दहा वर्षांपूर्वी सोनलचा विवाह हिमांशू नामक युवकाशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी त्याची लष्करात निवड झाली आणि राजस्थानमध्ये नियुक्ती मिळाली. बुधवारी हिमांशू सुट्टीवर घरी आला होता. रात्रीच्या सुमारास त्याने पत्नी आणि दोन महिन्यांच्या मुलीला पेट्रोल टाकून जाळले आणि घराला कुलूप लावून पळ काढला. शेजारी राहणाऱ्या माहेरच्या मंडळींना कळताच त्यांनी घराचा दरवाजा तोडत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मुजफ्फरपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

विवाहबाह्य संबंध? 
आरोपी हिमांशूचे एका बँकेतील महिलेशी प्रेमसंबंध सुरू आहेत. तिच्याशी लग्न करण्यासाठी पत्नीला घटस्फोट मागत होता, परंतु विरोध करत असल्याने तिला नेहमीच मारहाण केली जात असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.

Web Title: A soldier on leave burns his wife and daughter alive; Striking type in Rajasthan