शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! अभ्यास कर म्हणून आई रोज ओरडायची; मग 5 वीतील मुलाने केलं धक्कादायक कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 12:49 IST

उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील लष्करी जवान सुरेंद्र सिंग यांची पत्नी सरिता सिंग यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. जवानाच्या पत्नीच्या हत्येची घटना त्यांच्या अल्पवयीन मुलानेच घडवून आणल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले. खरं तर हा मुलगा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आहे. होमवर्क न केल्यामुळे आई ओरडली होती शिवाय तिने मारहाण केल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. याच कारणावरून त्याने आईची हत्या केली. हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 19 जानेवारी रोजी पोलिसांनी पकडून बाल न्यायालयात हजर केले. 

माहितीनुसार, शहरातील कोतवाली परिसरातील फुलनपूर येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय सरिता सिंग यांची गुरुवारी 19 जानेवारी रोजी दुपारी हत्या करण्यात आली. या प्रकरणाची माहिती परिसरात कळताच पोलिसांना तात्काळ याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या स्टेशन प्रभारींनी मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. 

दररोज अभ्यास कर म्हणून आई ओरडायचीपोलिसांच्या तपासात महिलेच्या हत्येचा आरोपी त्यांचाच 14 वर्षांचा मुलगा आदित्य सिंग असल्याचे निष्पन्न झाले. मारेकरी आदित्यने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, आई सरिता सिंगच्या सततच्या मारहाणीमुळे तो त्रासला होता. आई सतत ओरडत असल्यामुळे त्याने तिची हत्या केल्याची कबुली आरोपी मुलाने दिली. 

आरोपीने पोलिसांना असेही सांगितले की, त्याला आईला मारायचे नव्हते, परंतु रागाच्या भरात झालेल्या हल्ल्यानंतर आईचा मृत्यू झाला. या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक ओमवीर सिंग यांनी सांगितले की, आरोपी मुलाला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस