बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:45 IST2025-10-31T18:27:10+5:302025-10-31T18:45:03+5:30
पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. बीएसएफने अधिकृत निवेदन जारी करून घुसखोराचे नाव इम्तियाज अहमद असे असल्याचे म्हटले आहे.

बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
मागील काही महिन्यांपासून भारत - पाकिस्तान सीमेवर मोठा बंदोबस्त आहे. 'ऑपरेशन सिंदूर' वेळी दोन्ही देशातील सीमेवर मोठा तणाव होता. दरम्यान, आता भारतीय सशस्त्र दलांनी सीमेवर दक्षता बाळगली आहे. मागील काही दिवसात असंख्य घुसखोरांना पकडले आहे. या क्रमात, बीएसएफने शुक्रवारी असाच आणखी एक प्रयत्न उधळून लावला. पाकिस्तान सीमा ओलांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी व्यक्तीला सैनिकांनी अटक केली.
BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
फिरोजपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका पाकिस्तानी व्यक्तीला अटक केली आहे, असे बीएसएफने अधिकृत निवेदन जारी केले आहे. बीएसएफ पंजाब फ्रंटियरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये याची माहिती दिली.
'जवानांना सीमेवर संशयास्पद हालचाली दिसल्या, त्यामुळे बीएसएफने तात्काळ कारवाई केली आणि जलालाबादजवळ भारतीय हद्दीत घुसलेल्या एका व्यक्तीला अटक केली. १६० व्या बटालियनच्या सैनिकांनी त्याला सीमा चौकीजवळ संशयास्पद हालचाल करताना पाहिले. बीएसएफच्या माहितीनुसार, घुसखोर इम्तियाज अहमद असे ओळख पटली आहे, तो पाकिस्तानच्या शकरगढ जिल्ह्यातील परवल गावचा रहिवासी आहे.
𝐁𝐒𝐅 𝐓𝐑𝐎𝐎𝐏𝐒 𝐍𝐀𝐁 𝐏𝐀𝐊𝐈𝐒𝐓𝐀𝐍𝐈 𝐈𝐍𝐓𝐑𝐔𝐃𝐄𝐑 𝐎𝐍 𝐏𝐔𝐍𝐉𝐀𝐁 𝐁𝐎𝐑𝐃𝐄𝐑
— BSF PUNJAB FRONTIER (@BSF_Punjab) October 31, 2025
Displaying utmost alertness and vigilance, #BSF troops apprehended a Pakistani intruder, who had illegally crossed the India-Pakistan International Border near Jalalabad, Ferozepur.… pic.twitter.com/Y0pdIBcbVO
"सर्वात दक्षता आणि सतर्कता दाखवत, बीएसएफ जवानांनी फिरोजपूरमधील जलालाबादजवळ भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा बेकायदेशीरपणे ओलांडणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. घुसखोराची ओळख पटली असून तो पाकिस्तानच्या शकरगढ जिल्ह्यातील नारोवाल तहसीलचा रहिवासी आहे आणि प्राथमिक चौकशीनंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी लाखा येथील बेहराम पोलिस ठाण्यात सोपवण्यात आले," असे बीएसएफने पोस्टमध्ये म्हटले आहे.