गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात प्रवाशाचा प्रताप; एअरहोस्टेसला झाला ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 09:25 IST2023-03-31T09:24:13+5:302023-03-31T09:25:44+5:30

२६ मार्च रोजी इंडिगो फ्लाइटमध्ये ही घटना घडली होती.

A passenger on a flight from Guwahati to Delhi vomited and urinated on the plane | गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात प्रवाशाचा प्रताप; एअरहोस्टेसला झाला ताप

गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात प्रवाशाचा प्रताप; एअरहोस्टेसला झाला ताप

नवी दिल्ली : इंडिगोच्या विमानामध्ये प्रवाशाने पुन्हा घाणेरडे कृत्य केले आहे. गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या ६ ई ७६२ या विमानामध्ये एका प्रवाशी विमान प्रवासादरम्यान टॉयलेटला जाण्यासाठी उठला. मात्र, त्याने विमानात उलट्या केल्या. एवढेच नाही तर त्याने त्याने टॉयलेटच्या बाहेर लघवी केली. 

२६ मार्च रोजी इंडिगो फ्लाइटमध्ये ही घटना घडली होती. मद्यधुंद प्रवाशाने उलट्या केल्यानंतर या वातावरणात इतर प्रवाशांना बसणे अत्यंत कठीण झाले होते. त्यामुळे ऑन-बोर्ड एअरहोस्टेसला विमानाच्या फरशीवर पडलेली उलटी पुसावी लागली. इंडिगोने  निवेदन जाहीर करत म्हटले आहे की, प्रवासी आजारी होता, त्यामुळे त्याने उलटी केली.

Web Title: A passenger on a flight from Guwahati to Delhi vomited and urinated on the plane

टॅग्स :airplaneविमान