प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:21 IST2025-12-04T18:20:36+5:302025-12-04T18:21:07+5:30
पीडित पतीने एसपींकडे (जिल्हा पोलीस अधीक्षक) तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत, तपासही सुरू करण्यात आला आहे.

प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
उत्तर प्रदेशातील हापूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक महिला आपल्या दोन लहान मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे, घरातून जाताना तिने रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले. महत्वाचे म्हणजे पळून जाताना तिने आपल्या लहान बहिणीचाही विचार केला नाही. तिने तिचा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त केल्याचेही सांगण्यात येत आहे.
पीडित पतीने एसपींकडे (जिल्हा पोलीस अधीक्षक) तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत, तपासही सुरू करण्यात आला आहे. पीडित पतीने म्हटले आहे की, त्याचे १२ वर्षांपूर्वी बुलंदशहर येथील रोहिनी नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. त्यांच्या लहान मेहुणीचे लग्न अगौता मिलजवळल गगारी गावातील मोनू नावाच्या तरुणाशी ठरले होते.
पीडित व्यक्तीच्या आरोपानुसार, मोनूने त्याच्या पत्नीचा अर्थात होणाऱ्या मोठ्या मेहुणीचा फोन नंबर घेतला आणि तिच्याशी बोलू लागला. मोनूने बोलता बोलता तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि भेटायला बोलावू लागला. १२ नोव्हेंबरच्या सकाळी त्याची पत्नी कामावर जात असल्याचे सांगून घरातून निघाली, पण परतलीच नाही. पत्नी घरी परतली नाही म्हणून तपास केला असता, घरात ठेवलेले ५० हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ती पळून गेल्याचे उघड झाले.
पीडितेला दोन मुले आहेत. पत्नीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने त्याने एसपीकडे धाव घेतली. एसपीच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक देवेंद्र सिंह बिष्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू आणि त्याचा भाऊ लोकेश यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल.