शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

चिंतेचा बाब! भारतात दरवर्षी 'या' कारणामुळे 2.18 मिलियन मृत्यू मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:58 IST

मृत्यूच्या बाबतीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक आहे.

Pollution in India: दिवसेंदिवस आपल्या सभोवतालची हवा विषारी होत चालली आहे. जगातील अनेक यंत्रणांनी प्रयत्न करुनही हवेचे प्रदूषण रोखण्यात यश आले नाही. दरम्यान, एक अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्याने भारतीय शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. अभ्यासानुसार, वायू प्रदूषणामुळेभारतात दरवर्षी 2.18 मिलियन मृत्यू होतात.

अभ्यास काय सांगतो?The BMJ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 2.18 दशलक्ष मृत्यू होत आहेत, जे चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रदूषणाच्या या कारणांमध्ये जवळपास सर्व बाह्य स्रोतांचा समावेश होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, उद्योग, वीज निर्मिती आणि वाहतुकीमध्ये जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी 5.1 मिलियन अतिरिक्त मृत्यू होतात. या अभ्यासासाठी नवीन मॉडेल वापरण्यात आले.

आकडे भितीदायक संशोधकांचा असा अंदाज आहे की, 2019 मध्ये जगभरातील एकूण अंदाजे 8.3 मिलियन मृत्यूपैकी 61 टक्के मृत्यू सर्व स्त्रोतांकडून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे झाले आहेत. हा आकडा भितीदायक आहे, कारण हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे. जीवाश्म इंधनामुळे होणारे हे प्रदूषण अक्षय ऊर्जेने बदलले जाऊ शकते.

मृत्यू कसे होतात?संशोधकांना असे आढळून आले की, सुमारे 52 टक्के मृत्यू इस्केमिक हृदयरोग, स्ट्रोक, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज आणि मधुमेह यासारख्या सामान्य परिस्थितींशी संबंधित आहेत. तसेच, सुमारे 20 टक्के मृत्यू प्रकरणे उच्च रक्तदाब, अल्झायमर आणि पार्किन्सन रोग यांसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांशी संबंधित आहेत.

मृत्यू टाळता येतील का?संशोधकांचा असा विश्वास आहे की जीवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेले देश त्यांचा वापर टाळून दरवर्षी सुमारे 4.6 लाख म्हणजेच 0.46 दशलक्ष मृत्यू टाळू शकतात. यामध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेली COP28 हवामान बदल चर्चा जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या दिशेने बर्‍याच प्रमाणात प्रभावी ठरू शकते. असे मार्ग शोधले जात आहेत जेणेकरून जीवाश्म इंधन कमीत कमी वापरला जाईल.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतDeathमृत्यू