प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 19:04 IST2025-05-27T19:02:57+5:302025-05-27T19:04:43+5:30
Crime News: घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीनेच ती काम करत असलेल्या घरातील रोख रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बहराइच येथे घडली आहे. या प्रकरणी पोलसांनी घरकाम करणारी ही मोलकरीण आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...
घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीनेच ती काम करत असलेल्या घरातील रोख रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बहराइच येथे घडली आहे. या प्रकरणी पोलसांनी घरकाम करणारी ही मोलकरीण आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपी महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिच्या प्रियकराच्या घरामधून चोरी केलेले दागदागिने जप्त केले आहेत.
याबाबत मिलालेल्या अधिक माहितीनुसार काझीपुरा मोहल्ला येथे राहणारी अरिवा ही अरुण सोनीच्या प्रेमात पडली होती. अरिवा ही तिच्या घराजवळच असलेल्या एका घरात दरमहा ८०० रुपये पगारावर साफसफाईचं काम करायची. तिने तिच्या प्रियकराच्या अय्याशीसाठी घरमालकाच्या तिजोरीवरच डल्ला मारला.
चोरीचे हे दागिने आणि रोख रक्कम खर्च करून तिने प्रियकराला सव्वा लाख रुपयांची दुचाकी घेऊन दिली. उर्वरित चोरीचे दागिने तिने प्रियकराच्या घरी लपवून ठेवले. हे पैसे ते नंतर मौजमजेसाठी वापरणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी तिला अटक केली.