शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

तिसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडला; 9 हजाराचं चालान कापल्याने मजुराने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:16 IST

हैदराबादमध्ये एका 50 वर्षीय मजुराने शुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

नवी दिल्ली : हैदराबादमध्ये एका 50 वर्षीय मजुराने शुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला तिसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडण्यात आले असता, पोलिसांनी त्याच्याकडून हजारो रुपयांचे चालान कापले. मग व्यथित झालेल्या मजुराने सैदाबाद येथील राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवले. याप्रकरणी आता त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी ए येलैया या मजुराची दुचाकी जप्त केली होती. यासोबतच त्याला 9 हजार रूपयांचे चालान भरण्यास सांगितले. यानंतर अस्वस्थ होऊन तो घरी परतला आणि त्याने आत्महत्या केली. त्याच्या पॉकेटमधून एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात वाहनाच्या चालानबाबत नाराजी नोंदवण्यात आली आहे. 

दुचाकी परत न मिळण्याच्या भीतीने संपवलं जीवनयेलैया यांची पत्नी मल्लम्मा हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी पतीला ओवेसी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पाकिटात सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत पतीने आपल्या विरोधात ट्रॅफिक चालान बजावण्यात आले असून आपली दुचाकी परत मिळणार नाही या भीतीने आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. 

पत्नी मल्लम्माच्या तक्रारीवरून सैदाबाद पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 अन्वये संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर, नलगोंडा जिल्ह्यातील नेरेडिकोम्मा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :hyderabad-pcहैदराबादCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीसLabourकामगारDeathमृत्यू