४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:03 IST2025-09-04T13:57:21+5:302025-09-04T14:03:39+5:30

सापांचा सुळसुळाट असणाऱ्या एखाद्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला अगदी दोन किंवा तीन वेळा देखील साप चावण्याची  घटना घडू शकते. मात्र, एका लहान मुलीला तब्बल १२ वेळा साप चावल्याची घटना समोर आली आहे.

A girl was bitten by a snake 12 times in 42 days; but what was the real reason? The doctor said... | ४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...

४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...

सर्पदंशाच्या अनेक घटना आपल्या कानावर पडत असतात. सापांचा सुळसुळाट असणाऱ्या एखाद्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला अगदी दोन किंवा तीन वेळा देखील साप चावण्याची  घटना घडू शकते. मात्र, एका लहान मुलीला तब्बल २ वेळा साप चावल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशसतील कौशंबी जिल्ह्यातील १५ वर्षांच्या रियाला तब्बल १२ वेळा साप चावल्याची घटना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर डॉक्टरांची एक टीम रियाच्या घरी पोहोचली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, रियाचे संपूर्ण घर मातीचे असल्याचे लक्षात आले. यामुळे तिच्या घरात अनेक बिळं असू शकतात, असा अंदाज त्यांनी बांधला आहे. 

टीमने तिच्या घराभोवती औषध फवारणी केली आणि तिच्यावर उपचारही केले. पण रियाला भीती आहे की साप तिला पुन्हा चावू शकतो. ती यामुळे तणावात आहे. सध्या तिला जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे, सीएमओ डॉ. संजय कुमार यांनी या घटनेबद्दल सांगितले की, साप विषारी आहे की नाही हे आताच संगत येणं नाही. ते म्हणाले की जेव्हा आम्ही रियाच्या घरी पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसले की घर मातीचे होते आणि अनेक ठिकाणी सापांची बिळे होती. एकाच सापाने चावा घेतला आहे की अनेक सापांनी चावा घेतला आहे याचा कोणताही ठोस पुरावा नाही. आमची टीम रिया मौर्यवर उपचार करत आहे. ती पूर्णपणे ठीक आहे.

या प्रकरणात, कौशांबी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरिओम कुमार सिंह यांचे मत आहे की, साप ४२ दिवसांत १२ वेळा एकाच व्यक्तीला चावू शकत नाही. हा एक प्रकारचा आजार आहे ज्याला रेप्टिलियन फोबिया म्हणतात. ही रुग्ण रेप्टिलियन फोबियाने ग्रस्त असू शकते. उपचाराने ती पूर्णपणे बरी होऊ शकते. त्याचे उपचार पूर्णपणे शक्य आहेत आणि ते फक्त आमच्या जिल्ह्यातील संयुक्त रुग्णालयात उपलब्ध आहेत.

सरपटणाऱ्या प्राण्यांचा भय!

सरपटणाऱ्या प्राण्यांचा भय किंवा हर्पेटोफोबिया म्हणजे सरडे, साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटते. ही भीती एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कामांवर मर्यादा घालू शकते. आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना पाहून किंवा विचार करून तीव्र चिंता निर्माण करू शकते. या भयाच्या उपचारांमध्ये मानसशास्त्रीय उपचार, विशेषतः संज्ञानात्मक वर्तणुकीय थेरपी (CBT) आणि काही प्रकरणांमध्ये औषधोपचार यांचा समावेश असू शकतो.

या आजारात सरपटणाऱ्या प्राण्यांची तीव्र, अतार्किक आणि सततची भीती असते. अशा रुग्णाला खालील लक्षणे असू शकतात. या फोबियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला तीव्र भीती, चिंता, घाबरणे, घाम येणे आणि जलद हृदयाचे ठोके येणे अशी लक्षणे असू शकतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचे फोटो किंवा कार्टून पाहिल्याने, स्पर्श केल्याने किंवा पाहिल्यानेही भीती निर्माण होऊ शकते.

मानसशास्त्रीय उपचार

कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) सारख्या थेरपीमुळे व्यक्तीचे विचार आणि वर्तन बदलण्यास मदत होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, डॉक्टर औषधे देखील लिहून देऊ शकतात.

हा फोबिया कसा काम करतो?

हा एक प्रकारचा विशिष्ट फोबिया आहे, म्हणजेच तो एखाद्या वस्तू किंवा परिस्थितीला होणारा भीतीदायक प्रतिसाद आहे. जेव्हा एखादी व्यक्ती ज्या सरपटणाऱ्या प्राण्याला घाबरते त्याच्या संपर्कात येते तेव्हा त्याला पॅनिक अटॅक देखील येऊ शकतो. अशा परिस्थितीत, रुग्णाच्या कुटुंबाने त्याची चांगली काळजी घ्यावी, त्याला एकटे सोडू नये आणि त्याला चांगली झोप मिळेल याची खात्री करावी. यासाठी, रुग्णाला रुग्णालयात दाखल करून डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.

Web Title: A girl was bitten by a snake 12 times in 42 days; but what was the real reason? The doctor said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.