"ऑपरेशनमुळं पोट फुगलंय", मुलीकडच्यांचं कारण पण लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू झाली 'आई'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 17:46 IST2023-06-29T17:46:10+5:302023-06-29T17:46:39+5:30
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

"ऑपरेशनमुळं पोट फुगलंय", मुलीकडच्यांचं कारण पण लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू झाली 'आई'
नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक अनोखी अन् धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी लग्न झालेली नववधू लग्नाच्या तिसऱ्या दिवशी आई झाल्याने एकच खळबळ माजली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अचानक पोटात दुखू लागल्याने तिला सासरच्यांनी इस्पितळात दाखल केले. मग ती गरोदर असल्याचे उघड झाले. लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने एका मुलीला जन्म दिला.
खरं तर मागील सोमवारी नोएडातील दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात राहणाऱ्या तरूणाचे सिकंदराबाद येथील तरुणीशी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर नवरी सासरी गेली पण सुहागरातच्या दिवशी तिच्या पोटात दुखू लागले. यामुळे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी तिला तातडीने दनकौर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी केली असता ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. हे ऐकून सासरच्यांनाही धक्का बसला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने एका चिमुकलीला जन्म दिला. यानंतर मुलाच्या बाजूच्या लोकांनी नवरीच्या घरच्यांना माहिती दिली तिला आपल्याकडे ठेवण्यास नकार दिला.
"ऑपरेशनमुळं थोडं पोट फुगलंय"
माहिती मिळताच नववधूच्या कुटुंबीयांनी तिला आणि निष्पाप मुलीला आपल्या सोबत घेतले. मात्र, या प्रकरणी अद्याप मुलाच्या बाजूने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मुलीच्या घरच्यांनी ही गोष्ट मुलांपासून लपवून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मुलाकडील मंडळीला असेही सांगण्यात आले होते की, मुलीचे काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झाले होते म्हणून तिचे पोट थोडेसे फुगले आहे. दनकौर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना याची माहिती मिळाली आहे पण अद्याप कोणीही तक्रार दाखल केली नाही.