शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

AC चालू ठेवून जाणं फ्लॅट मालकाला पडलं महागात; स्टॅबिलायझर गरम झाला, कपड्यांना आग लागली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 13:04 IST

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पश्चिम येथे एसीचा स्टॅबिलायझर गरम झाल्यामुळे आग लागली.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पश्चिम येथील पॅरामाउंट इमोशन्स या हायराईज सोसायटीच्या सातव्या मजल्यावर रात्री उशीरा अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले. अग्नीशमनदलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या आगीमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरात ठेवलेले काही सामान जळून खाक झाले आहे. 

माहितीनुसार, पॅरामाउंट इमोशन्स सोसायटीच्या जे टॉवरच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रात्री उशिरा अचानक आग लागल्याने संपूर्ण सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. आग लागताच आजूबाजूच्या फ्लॅटमधील रहिवासी आपले फ्लॅट सोडून इमारतीखाली जमा झाले. सोसायटीतील लोकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस व अग्निशमन दलाने मिळून आग आटोक्यात आणली. फ्लॅट क्रमांक ७०५ मध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

ACच्या स्टॅबिलायझरने लागली आगपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटचा मालक एसी चालू ठेवून घराबाहेर गेला होता. एसी बराच वेळ सुरू असल्याने त्याचा स्टॅबिलायझर जळाला, त्यामुळे शेजारी ठेवलेल्या कपड्यांना आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग फ्लॅटमध्ये पसरली. सोसायटीतील लोकांनी फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. तात्काळ अग्निशमन दलाच्या पथकासह आम्ही घटनास्थळी पोहोचलो. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. थोडा उशीर झाला असता तर आग आणखी पसरली असती, असेही पोलिसांनी सांगितले. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfireआगPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दल