Love Affair: 25 वर्षीय शिक्षकाचे 12वीतील विद्यार्थिनीवर जडलं प्रेम; घरच्यांनी विरोध केला असता गेले पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 14:29 IST2023-02-05T14:28:28+5:302023-02-05T14:29:09+5:30
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे.

Love Affair: 25 वर्षीय शिक्षकाचे 12वीतील विद्यार्थिनीवर जडलं प्रेम; घरच्यांनी विरोध केला असता गेले पळून
नवी दिल्ली : बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एका शिक्षकाचे आपल्या विद्यार्थिनीवर प्रेम जडले आणि आता दोघेही पळून गेले. सुबोध कुमार नावाचा शिक्षक 12वीच्या विद्यार्थ्याला कोचिंग शिकवत असे, त्यादरम्यान तो विद्यार्थीनीच्या प्रेमात पडला. शिक्षकाच्या प्रेमप्रकरणाला मुलीच्या कुटुंबीयांनी विरोध केला असता तो विद्यार्थिनीसह पळून गेला. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर आरोपी शिक्षकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकाचे विद्यार्थिनीवर जडलं प्रेम
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक 25 वर्षांचा आहे, तर विद्यार्थीनी 19 वर्षांची आहे. मागील दोन वर्षांपासून ही मुलगी सुबोधकुमारकडे शिकवणीसाठी जात होती. सुबोध कुमार मझौरा येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक आहे. मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की कोचिंगमध्ये शिकवत असताना सुबोध कुमारने त्यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी शिक्षक सुबोध कुमार आणि तिच्या कुटुंबियांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी बारावीत शिकत असून मागील दोन वर्षांपासून ती सुबोध कुमारकडे शिकण्यासाठी जात होती. दरम्यान, सुबोधने आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी मुलीला कोचिंगला न जाण्यास सांगितले. यानंतरही आरोपी शिक्षक त्यांच्या घराभोवती फिरत असे. अनेकवेळा तो त्याच्या मित्रांसोबत घराकडे फिरतानाही दिसला आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी शिक्षक घराजवळ फिरत असल्याचे पाहून त्यांनी त्याला येथे येण्यास मनाई देखील केली, परंतु त्याने ऐकले नाही.
पोलिसांकडे तक्रार दाखल
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी आरोपीने त्यांच्या मुलीचे अपहरण केले. मुलीच्या नातेवाइकांनी मुलीसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासंदर्भात पोलिसांकडे मुलीला सुखरूप बाहेर काढण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकारी एएसआय लालन कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"