शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू मुलीचे अपहरण करून केले धर्मांतर, जबरदस्तीने लावले लग्न; मौलवीसह 10 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 18:17 IST

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात धर्मांतराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

फतेहपूर : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात धर्मांतराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आठ महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या हिंदू मुलीचे धर्मांतर केल्यानंतर तिचे बळजबरीने लग्न लावण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच मुलीच्या आईने घटनास्थळ गाठले, बळजबरीने सुरू असलेल्या लग्नाला मुलीच्या आईने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. याशिवाय त्यांनी तिचे कपडे फाडले. घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मौलवीसह दोन जणांना ताब्यात घेतले. 

या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मौलवी कल्लू यासह 10 जणांविरुद्ध अपहरण, धर्मांतर, मारहाण, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी आणि देशद्रोह या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. खरं तर ही घटना असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातोपीत गावातील आहे. कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील हरिहरगंज येथील रहिवासी मानसी गुप्ता ही तरूणी 8 मे 2022 रोजी संशयास्पद स्थितीत बेपत्ता झाली होती. या प्रकरणी आई अंजुला गुप्ता यांनी कोतवाली येथे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. लग्नाला विरोध केल्याने दिली जीवे मारण्याची धमकीमाहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी मुलीच्या आईला समजले की आरोपी अन्सार अहमद हा तिच्या मुलीचे असोथर पोलीस स्टेशन हद्दीतील सातो गावात जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न करत आहे. त्यानंतर मुलीची आई सातो या गावात पोहोचली. तिथे मौलवी लग्न लावत असल्याचे मुलीच्या आईने पाहिले. तिने लग्नाला विरोध केला असता आरोपीने तिला बेदम मारहाण करून तिचे कपडे फाडले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मौलवीसह दोघांना अटक केली.

विविध कलमांखाली घेतलं ताब्यात पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून असोथर पोलिसांनी आरोपी अन्सार अहमद, त्याची आई साहरुन निशा, भाऊ नौशाद अली, दिलशाद अली, मेहुणी सोनी बानो, यास्मीन, बहीण तहरुण निशा आणि मौलवी कल्लू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध आयपीसीच्या कलम 147, 323, 504, 506, 366, 354 आणि उत्तर प्रदेश कायदा 2021 च्या कलम 3, 5 (1) अन्वये गुन्हा दाखल केला. लक्षणीय बाब म्हणजे मुख्य आरोपी अन्सार अहमद आणि मौलवी कल्लूला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील 8 आरोपी अद्याप फरार आहेत.

मुलीला आमिष दाखवून केले अपहरण सीओ थारियाव दिनेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, असोथर पोलीस स्टेशन परिसरात मुलीला आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर मुख्य आरोपी अन्सार अहमद आणि मौलवी कल्लू यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीHinduहिंदूArrestअटकPoliceपोलिस