बेळगावात पेट्रोल पंपावरच कारला लागली आग, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 16:31 IST2023-09-12T16:30:38+5:302023-09-12T16:31:22+5:30
प्रकाश बेळगोजी बेळगाव : शहरातील एका पेट्रोल पंपावरच अचानक एका कारला आग लागली. प्रसंगावधान राखून कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा ...

बेळगावात पेट्रोल पंपावरच कारला लागली आग, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
प्रकाश बेळगोजी
बेळगाव: शहरातील एका पेट्रोल पंपावरच अचानक एका कारला आग लागली. प्रसंगावधान राखून कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आज मंगळवारी ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, नेहरूनगरच्या बी. बी. होसमनी यांच्या मालकीच्या असलेल्या पेट्रोल पंपावर एक कार डिझेल भरण्यासाठी आली. दरम्यानच कारच्या बोनेटमध्ये अचानक आग लागली. ही घटना घडली तेव्हा गाडीचा मालक याठिकाणी नव्हता. आगीची घटना निदर्शनास येताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित अग्निशमन सामग्रीच्या सहाय्याने मोठ्या कौशल्याने आग विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्रसंगावधान राखून दाखवलेल्या तत्परतेबद्दल कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.