शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

४० प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पलटली; अपघातानंतर बस आगीत जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 16:06 IST

मध्यरात्री गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला, तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला.

हैदराबाद - तेलंगणाच्या जोगुलंबा गडवाल जिल्ह्यात एका खासगी बसचा अपघात होऊन बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत बसमधील एक महिला प्रवाशाचा जळून मृत्यू झाला. तर, एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. शनिवारी सकाळी ३ वाजता हैदराबादहून चित्तूरकडे जाणाऱ्या जगन अमेजॅन ट्रॅव्हल्सच्या बससोबत ही दुर्घटना घडली. स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 

मध्यरात्री गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला, तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. या बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. अपघात झाल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यामुळे, बसला आग लागली. अपघातानंतर प्रवाशांनी तात्काळ बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रवासी बसमधून बाहेर आले. मात्र, एका महिला प्रवाशाचा हात अडकल्याने तिला बसमधून बाहेर येता आले नाही. त्यानंतर, बसने मोठा पेट घेतल्याने या महिलेचा जळून मृत्यू झाला. 

दरम्यान, पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी अग्निशमक दलाच्या गाडीने बसला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र, या दुर्घटनेत बस जळून खाक झाली. 

टॅग्स :AccidentअपघातFire Brigadeअग्निशमन दलhyderabad-pcहैदराबादPoliceपोलिस