शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

संतापजनक! लग्नाला देत होता नकार; प्रेयसीने जबरदस्तीने प्रियकराला सांगून सख्ख्या भावाची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 15:03 IST

राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील गंगरार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे सुमारे 200 फूट खोल विहिरीत अज्ञात व्यक्तीचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला होता. महेंद्र रायका असे मृतदेहाचे नाव असल्याचे सुरूवातीला समोर आले. मात्र विहिरीतून मृतदेह बाहेर काढत असताना एक व्यक्ती पोलिसांना न विचारता त्यांची मदत करत होता. त्याने आपले नाव महावीर धोबी असल्याचे सांगितले.

दरम्यान, संबंधित तरूण मृतदेह स्वच्छ देखील करू लागला. मृत व्यक्तीच्या हातावर काहीतरी लिहले होते, जे कमलेश रायका असल्याचे पोलिसांना वाटले परंतु, पोलिसांची मदत करत असलेल्या महावीरला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक तो कमलेश नसून हे नाव महेंद्र रायका असल्याचे त्याने सांगितले. त्याचवेळी पोलिसांना महावीरवर संशय आला. त्याच्या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली आणि नंतर त्याने हत्येचे संपूर्ण रहस्य सांगितले.

प्रियकराने केला धक्कादायक खुलासा SHO शिवलाल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान महावीर धोबीने अनेक धक्कादायक खुलासे केले. "आपल्याला ही हत्या करायची नव्हती मात्र मृत तरूणाची बहिण तनु ही माझी प्रेयसी आहे आणि तिलाच मृत कमलेश रायकाला आमच्या लग्नासाठी राजी करायचे होते. मी तनुला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मान्य झाली नाही आणि महेंद्रला मारण्यासाठी दबाव टाकत राहिली", असे हत्या करणाऱ्या महावीरने सांगितले. मृत महेंद्र रायका हा आई आणि दोन बहिणींसोबत त्याचे मामा शांतीलाल यांच्या घरी राहत होता. जवळच महावीरचे घर होते. महावीर महेंद्रच्या घरी सतत यायचा. यादरम्यान, महावीर आणि तनु यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. महावीर आणि तनुष्का दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते."

3 वर्षांपासून सुरू होते प्रेमसंबंधमागील तीन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते आणि दोघांनाही लग्न करायचे होते मात्र घरच्यांनी तिचे लग्न उज्जैन येथील एका व्यक्तीशी ठरवले होते. हा विवाह अट्टाहासाने होत होता. यामुळे व्यथित झालेली प्रेयसी तनु ही तिचा प्रियकर महावीरवर दबाव टाकत होती. प्रेयसीच्या प्रेमापोटी महावीरने मित्राच्या मदतीने प्रेयसीच्या भावाची हत्या केली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रियकर महावीरने तनुकडून घेतले होते 40 हजार रूपयेप्रियकर महावीरने आपल्या बहिणीकडून 40 हजार रूपये घेतले असल्याची माहिची मृत महेंद्रला मिळाली होती असे तपासात समोर आले आहे. महेंद्र महावीरला सतत त्याच्या घरी येण्यापासून रोखत होता. यासोबतच तो बहिणीकडेही पैशांची मागणी करत होता. अशा स्थितीत पैसे देऊन लग्नही करावे लागत नसल्याने महावीरने महेंद्रची हत्या केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक