जिवंत मासा तोंडात पकडला आणि २९ वर्षीय तरुणाचा जीव गेला; मासे पकडताना काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:06 IST2025-04-10T13:01:50+5:302025-04-10T13:06:56+5:30

Man Fish Killed: २९ वर्षीय तरुण तलावावर मासे पकडण्यासाठी गेला होता. जाळ्याऐवजी हातानेच मासे पकडण्याची त्याला सवय होती. पण, एक चूक झाली आणि त्याला जीव गमवावा लागला.

A 29-year-old man died after catching a live fish in his mouth; what happened while catching the fish? | जिवंत मासा तोंडात पकडला आणि २९ वर्षीय तरुणाचा जीव गेला; मासे पकडताना काय घडलं?

जिवंत मासा तोंडात पकडला आणि २९ वर्षीय तरुणाचा जीव गेला; मासे पकडताना काय घडलं?

२९ वर्षाचा मणिकंदन मासे पकडण्यासाठी तलावावर गेला. त्याने हाताने एक मासा पकडला. त्यानंतर दुसरा मासा पकडण्यासाठी त्याने हातातील मासा तोंडात धरला आणि नको तेच घडलं. मणिकंदनचा गुदमरून मृत्यू झाला. तामिळनाडूतील मदुरंतकम येथे ही घटना घडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मिळालेल्या माहितीनुसार २९ वर्षीय मणिकंदन मंगळवारी सकाळी कीलवझ तलावावर नेहमीप्रमाणे मासे पकडायला गेला होता. पण, मासे पकडण्याचा त्याचा हा शेवटचा दिवस ठरला. 

वाचा >>होणाऱ्या जावयासोबत फरार झालेल्या सासूचा ठावठिकाणा अखेर सापडला, ताब्यात घेण्यासाठी पोलीस रवाना

पोलिसांनी सांगितले की, मणिकंदन तलावातील कमी खोली असलेल्या पाण्यात उतरला होता. तो नेहमीप्रमाणे हाताने मासे पकडू लागला. त्याने दोन मासे पकडले. मासे प्रचंड चपळ असतात. हातातून निसटतात. त्यामुळे तो त्यांना तोंडात पकडायचा, जेणेकरून निसटणार नाही. 

नेहमीप्रमाणे मासा तोंडात पकडला अन्...

मणिकंदनने एक मासा तोंडात धरला आणि दुसरा मासा पकडण्यासाठी खाली वाकला. पण, त्याचवेळी तोंडात धरला मासा तडफड केली आणि त्याच्या घशात गेला आणि फसला. पनंगोट्टई असे या माशाचे नाव आहे. या माशाच्या पाठीवर काटे असतात. हे काटे मणिकंदनच्या श्वसन नलिकेमध्ये फसले. त्यामुळे त्याचा श्वास कोंडला गेला. 

त्यानंतर मणिकंदन पाण्यात बाहेर आला अरैयप्पक्कम या त्याच्या गावाच्या दिशेने धाव सुटला. पण धावताना तो रस्त्यातच कोसळला. काही रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला बघितले. ते मदतीला धावून आले. त्यांनी घशात अडकलेला मासा काढण्याचा प्रयत्न केला, काटेच अडकलेले असल्याने त्याची प्रकृती आणखी बिघडली. 

रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू 

मणिकंदनला लोकांनी तातडीने चेंगलपेट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. गावकऱ्यांनी सांगितले की, मणिकंदन मजूर होता. तो मासे पकडण्यात खूप तरबेज होता. नेहमी तो मित्रासोबत मासे पकडायला जायचा, मंगळवारी तो एकटाच गेला आणि त्याला वेळेत मदत मिळू शकली नाही. 

Web Title: A 29-year-old man died after catching a live fish in his mouth; what happened while catching the fish?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.