औरंगजेबाच्या कबरीभाेवती १२ फूट उंच पत्र्याचे कुंपण; भिंतीवर काटेरी ताराही, नुकसान टाळण्यासाठी केंद्राकडून खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:20 IST2025-04-05T10:19:59+5:302025-04-05T10:20:49+5:30

Aurangzeb's tomb; मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खबरदारीचे उपाय करीत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली. 

A 12-foot-high metal fence surrounds Aurangzeb's tomb; barbed wire on the wall | औरंगजेबाच्या कबरीभाेवती १२ फूट उंच पत्र्याचे कुंपण; भिंतीवर काटेरी ताराही, नुकसान टाळण्यासाठी केंद्राकडून खबरदारी

औरंगजेबाच्या कबरीभाेवती १२ फूट उंच पत्र्याचे कुंपण; भिंतीवर काटेरी ताराही, नुकसान टाळण्यासाठी केंद्राकडून खबरदारी

 नवी दिल्ली -  महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये असलेल्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खबरदारीचे उपाय करीत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात शेखावत यांनी औरंगजेबाची कबर एएसआयचे एक संरक्षित स्मारक असल्याचे सांगून याचा तपशील एएसआयच्या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचे नमूद केले. 

काय होता प्रश्न?
औरंगजेबाची कबर एएसआयच्या कक्षेतील संरक्षित स्मारक आहे का आणि असेल तर या तपशिलाचा उल्लेख एएसआयच्या वेबसाइटवर केला आहे का?. कबरीचे नुकसान होण्याचा धोका आहे हे एएसआयला ज्ञात आहे का आणि असेल तर याच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली आहेत,  अशी विचारणाही करण्यात आली होती. 

अशा असतील उपाययोजना
या संरक्षित स्मारकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून एएसआय सातत्याने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पावले उचलत आहे. 
यात मकबऱ्याच्या चारही बाजूला १२ फूट उंच पत्र्याचे कुंपण लावणे, अतिक्रमण करणाऱ्यांना अटकाव व्हावा म्हणून कबरीच्या शेजारील भिंतींवर काटेरी तारा लावणे.
मल्टि टास्किंग स्टाफसोबतच खासगी सुरक्षा रक्षक तैनात करून याची एएसआय अधिकाऱ्यांमार्फत नियमित निगराणी करणे यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: A 12-foot-high metal fence surrounds Aurangzeb's tomb; barbed wire on the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.