शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Ram Mandir Bhumi Pujan : कोर्टात रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय वकिलांनी टीव्हीवर पाहिला भूमिपूजन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 5:19 PM

तामिळनाडूच्या श्रीरंगम येथे जन्मलेल्या परासरन यांनी 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून सराव सुरू केला.

ठळक मुद्देमाजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती, त्यावेळी ते तामिळनाडूचे महाधिवक्ता होते.परासरन यांना राम मंदिराच्या बांधकामासाठी स्थापन केलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे संस्थापक- सदस्य केले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन करण्यात आले.  कोरोना संकटामुळे भूमिपूजन सोहळ्याला फक्त खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. राम मंदिर आंदोलनाशी संबंधित अनेकांनी वय आणि आरोग्याच्या समस्येमुळे संपूर्ण सोहळा घरीच टीव्हीवर पाहिला.

सर्वोच्च न्यायालयात रामलल्ला विराजमानतर्फे बाजू मांडणारे आणि खटला लढणारे ज्येष्ठ वकील 92 वर्षीय के. परासरन यांनी राम मंदिर भूमिपूजनाचा संपूर्ण कार्यक्रम घरातूनच टीव्हीवर पाहिला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोत परासरन अतिशय भावनिक झाल्याचे दिसून येत आहे.

परासरन यांना राम मंदिराच्या बांधकामासाठी स्थापन केलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे संस्थापक- सदस्य केले आहे. त्यांचे निवासस्थान आर -20, ग्रेटर कैलाश पार्ट 1 या पत्त्यावर ट्रस्टची नोंद देखील करण्यात आली आहे. रामलल्ला विराजमानचे वकील राहिलेले  परासरन यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परासरन कायद्याचे पदवीधर आहेत. हिंदू कायद्यात त्यांना गोल्ड मेडलने गौरवण्यात आले आहे.

- तामिळनाडूच्या श्रीरंगम येथे जन्मलेल्या परासरन यांनी 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून सराव सुरू केला. आपल्या सहा दशकांच्या कारकीर्दीत, त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण बाबींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.- हिंदू धर्मावर त्यांचे प्रभुत्व असल्याने या खटल्यात त्यांना जास्त स्वारस्य होते. ते दोनवेळा देशाचे अटॉर्नी जनरल म्हणून कार्य केले आहे.- माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती, त्यावेळी ते तामिळनाडूचे महाधिवक्ता होते.- 1980 मध्ये ते देशाचे सॉलिसिटर जनरल बनले आणि 1983 ते 1989 पर्यंत ते देशाचे अटॉर्नी जनरल होते.- परासरन यांना अटलबिहारी वाजपेयी सरकारकडून पद्मभूषण आणि मनमोहन सिंग सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.- याशिवाय, परासरन यांनी राष्ट्रपती कोट्यातून सहा वर्षांसाठी राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या