शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
5
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
6
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
7
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
8
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
9
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
10
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
11
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
12
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
13
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
14
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
15
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
16
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
17
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
18
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
19
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
20
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार

सीबीएसई दहावीमध्ये ९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुंबई, गोव्यासह महाराष्ट्राचा समावेश असलेला पुणे विभाग चौथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 06:20 IST

सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यावर्षी दहावीचे ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९३.३१ टक्के विद्यार्थिनी व ९०.१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत यावेळी ३.१७ टक्के जास्त विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून, बारावीप्रमाणेच याही परीक्षेची टॉपर मेरिट यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मुंबई, गोव्यासह महाराष्ट्राचा समावेश असलेला पुणे विभाग चौथ्या क्रमावर आहे.सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यावर्षी दहावीचे ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९३.३१ टक्के विद्यार्थिनी व ९०.१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत यावेळी ३.१७ टक्के जास्त विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. म्हणजेच यंदाही विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल मागील वर्षीपेक्षा यंदा आणखी सुधारला आहे. तथापि, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ९० व ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.सीबीएसई दहावी परीक्षेसाठी यंदा १८,८५,८८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८,७३,०१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १७,१३,१२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी ९१.१० टक्के विद्यार्थी पास झाले होते. यंदा देशात विभागवार निकाल पाहता यावेळीही त्रिवेंद्रम विभाग ९९.२८ टक्क्यांसह आघाडीवर आहे. दुसºया क्रमांकावर चेन्नई विभाग (९८.९५ टक्के), तिसºया क्रमांकावर बंगळुरू (९८.२३ टक्के) आहे. पुणे विभाग ९८.०५ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात मुंबई, महाराष्टÑ, गोवा, दीव-दमण, दादर-नगर हवेलीचा समावेश आहे. दिल्ली विभाग ८५.८६ टक्क्यांसह चौदाव्या स्थानावर आहे. कोरोना उद्रेकामुळे सीबीएसईच्या प्रलंबित परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. ईशान्य दिल्लीत दंगलीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या काही परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा