शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

80 वर्षीय पती अन् 76 वर्षीय पत्नी…लग्नाच्या 50 वर्षांनंतर दाम्पत्याचा घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 21:39 IST

या प्रकरणाची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.

अलीगढ: उत्तर प्रदेशातील अलीगढमधून घटस्फोटाचे आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या 50 वर्षांनंतर एका जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने निकाल देताना 80 वर्षीय पतीला 76 वर्षांच्या पत्नीला खर्चासाठी दरमहा 5 हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. त्यांचे नाते अबाधित राहावे यासाठी समुपदेशनही करण्यात आले, मात्र दोघेही पती-पत्नी वेगळे राहण्यावर ठाम होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा सत्र न्यायालय अलीगढमधील अतिरिक्त न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय ज्योती सिंह यांच्या न्यायालयाने वृद्ध पती-पत्नीमधील घटस्फोट प्रकरणात हा निकाल दिला आहे. लग्नाच्या 50 वर्षांनंतर या वृद्ध जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात वृद्ध जोडप्याच्या आयुष्याचा धागा अधिक घट्ट होतो असे म्हणतात, पण अलीगढमध्ये याउलट चित्र पाहायला मिळाले आहे.

2018 मध्ये कोतवाली बन्नादेवी परिसरातील रिसाल नगरमध्ये राहणाऱ्या 76 वर्षीय गायत्री देवी यांनी 80 वर्षीय मुनेश गुप्ता यांच्या विरोधात कोर्टात मेन्टेनन्सबाबत केस दाखल केली होती. किरण देवी यांनी आपल्या अपीलात न्यायालयाला सांगितले की, त्यांचा विवाह 25 मे 1972 रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. त्यांना तीन मुली आणि दोन मुले आहेत. लग्नानंतर पतीच्या वागण्यात हळूहळू बदल होत गेला. बरेच दिवस पतीचे वागणे सहन केले, मात्र नंतर ते वेगळे राहू लागले.

पत्नीने मागितला न्याय 80 वर्षीय पती मुनेश गुप्ता यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपी पतीविरुद्ध समन्स बजावले आणि त्याला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. मुनेश हजर झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले. तपासाअंती न्यायालयाने दोघांनाही समुपदेशनासाठी पाठवले, तेथे वकील आणि समुपदेशक योगेश सारस्वत यांनी वृद्ध पती-पत्नीला खूप समजावून सांगितले.

मालमत्तेबाबत वाद समुपदेशनादरम्यान पती मुनेशने कोणत्याही परिस्थितीत आपल्या वृद्ध पत्नीला पेन्शनमधून पैसे देण्यास नकार दिला. समुपदेशन संपल्यानंतर मुनेश यांच्या विरोधात निकाल देताना न्यायालयाने त्यांच्या निवृत्ती वेतनातून दरमहा 5 हजार रुपये वृद्ध पत्नी गायत्री देवी यांना देण्याचे आदेश दिले. पती मुनेश हे आरोग्य विभागातील पर्यवेक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. सध्या त्यांना सुमारे 35 हजार रुपये पेन्शन मिळते. पती मुनेश मोठ्या मुलासोबत तर पत्नी लहान मुलासोबत राहते. मुनेश यांना त्यांच्या लहान मुलाला मालमत्तेत कोणताही वाटा द्यायचा नाही.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नDivorceघटस्फोटJara hatkeजरा हटकेCourtन्यायालय