शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
4
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
6
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
7
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
8
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
9
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
10
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
11
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
12
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
13
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
14
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
15
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
16
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
17
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
18
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
19
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
20
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! दातावर उपचार करणं पडलं महागात; सलाईनच्या १ बॉटलने घेतला ८ जणांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:10 IST

डेंटल क्लिनिक उपचार करणं लोकांच्या जीवावर बेतलं आहे. उपचार घेतल्यानंतर ८ जणांचा मृत्यू झाला.

तामिळनाडूच्या तिरुप्पुर जिल्ह्यातील वानीयमबाडी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेंटल क्लिनिक उपचार करणं लोकांच्या जीवावर बेतलं आहे. उपचार घेतल्यानंतर ८ जणांचा मृत्यू झाला. न्यूरोमेलियोयडोसिस  नावाच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हे एक असं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जे थेट मेंदूवर हल्ला करतं. 

सीएमसी वेल्लोर, आयसीएमआर-एनआयई आणि तामिळनाडू सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त तपासणीत हे उघड झालं आहे. द लॅन्सेटमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. २०२३ मध्ये ही भयंकर घटना घडली होती परंतु कोणत्याही सरकारी संस्थेने त्याची माहिती सार्वजनिक केली नव्हती. घाणेरड्या  उपकरणांमुळे आणि स्वच्छतेतील निष्काळजीपणामुळे हे बॅक्टेरियल इन्फेक्शन पसरल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.

टीओआयच्या रिपोर्टनुसार, असं म्हटलं आहे की सलाईनची बॉटल पेरीओस्टियल एलिवेटर नावाच्या सर्जिकल उपकरणाचा वापर करून क्लिनिकमध्ये उघडण्यात आली होती, नंतर ती नीट बंद करण्यात आली नाही. नंतर तीच बाटली रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुन्हा पुन्हा वापरली जात होती. कमीत कमी १० लोकांना संसर्ग झाला आणि त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच ८०% रुग्णांचा मृत्यू झाला. अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. एंजेल मिराक्लिन थिरुग्नानकुमार (सीएमसी वेल्लोर) म्हणाले की, तोंडात घाणेरडं सलाईन गेल्याने बॅक्टेरिया थेट नसांमधून मेंदूपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे संसर्ग वेगाने पसरतो. त्यानंतर तो मेंदूवर हल्ला करतो.

न्यूरोमेलियोयडोसिस हा एक गंभीर संसर्ग आहे जो मेंदू आणि पाठीच्या कण्यावर परिणाम करतो. तो Burkholderia pseudomallei नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो, जो घाणेरड्या पाण्यात आणि मातीत आढळतो, विशेषतः उष्ण आणि दमट भागात आढळतो. या संसर्गाने बाधित व्यक्तीला ताप, डोकेदुखी, बोलण्यात अडचण, अंधुक दृष्टी आणि काही प्रकरणांमध्ये चेहऱ्याच्या नसा काम करणं बंद करणं अशी लक्षणं दिसू शकतात.

रिसर्चमध्ये २१ रुग्ण होते. यापैकी १० जणांनी डेंटल क्लिनिककडे उपचार घेतले होते. एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंटल क्लिनिकमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची प्रकृती खूप वेगाने बिघडली. लक्षणं दिसू लागल्यानंतर सरासरी १६ दिवसांनी, तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ९ दिवसांनी या रुग्णांचा मृत्यू झाला. सीएमसी वेल्लोरने रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली. १३ मे २०२३ रोजी तामिळनाडू आरोग्य विभागाने बैठक घेतली. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने तपास सुरू केला. तपास पथक पोहोचण्यापूर्वीच डेंटल क्लिनिक बंद करण्यात आलं. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDental Care Tipsदातांची काळजी