शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षांनी देशात चित्ते गुरगुरणार; शनिवारी राष्ट्रीय उद्यानात होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 05:54 IST

१९४८ मध्ये छत्तीसगढच्या कोरिया भागात रामगढच्या जंगलात महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी देशातील अखेरचे तीन चित्ते मारले होते.

भोपाळ : देशातून लुप्त झालेल्या चित्त्याची ७० वर्षांनी वापसी होणार आहे. मध्य प्रदेशच्या कुनो-पालपूर राष्ट्रीय अभयारण्यात १७ सप्टेंबर रोजी चित्ते दाखल होतील. मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वन संरक्षक जे. एस. चौहान यांनी सांगितले की, चित्त्यांना आफ्रिकी देश नामिबियातून राजस्थानच्या जयपूरमध्ये आणले जाईल. त्यानंतर एका हेलिकॉप्टरद्वारे १७ सप्टेंबरच्या सकाळी कुनो-पालपूरमध्ये आणले जाईल. छोटे हेलिकॉप्टर असल्यास चित्त्यांना जयपूरहून कुनो-पालपूरमध्ये स्थानांतरित करण्यासाठी दोन विमानांची गरज भासेल.

पंतप्रधान सोडणार जंगलात पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी चित्त्यांना जंगलात सोडणार आहेत. यासाठी विशेष अधिवास तयार करण्यात आला आहे. एक महिनाभर चित्त्यांना येथे ठेवले जाईल. 

महाराजा रामानुज यांनी मारला होता अखेरचा चित्ता

१९४८ मध्ये छत्तीसगढच्या कोरिया भागात रामगढच्या जंगलात महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी देशातील अखेरचे तीन चित्ते मारले होते. १६ व्या शतकात देशात हजारो चित्ते होते; परंतु राजा-महाराजांनी केलेल्या शिकारीमुळे त्यांची संख्या कमी होत गेली. १९५२ मध्ये भारत सरकारने चित्त्याला विलुप्त प्रजाती घोषित केले. संपूर्ण जगात सध्या केवळ ७,००० चित्ते अस्तित्वात आहेत व यातील बहुतांश चित्ते आफ्रिकेच्या जंगलात आहेत.

घटनाक्रम१९५५ मध्ये आंध्र सरकारच्या वन्य प्राणी बोर्डाने राज्याच्या दोन जिल्ह्यांत इराणहून दोन चिते भारतात आणण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती. साठच्या दशकात केनिया सरकारने भारताला चित्ते देण्याची तयारी दर्शवली होती. १९७० मध्ये भारत सरकारच्या पर्यावरण विभागाने इराण सरकारकडून चित्ते मिळविण्यासाठी चर्चा सुरू केली होती; परंतु इराणमध्ये सत्ताबदल झाल्याने चर्चा ठप्प झाली.

ऑगस्ट २००९ मध्ये इराणने चित्ते पाठविण्याची तयारी दर्शवली होती. त्या बदल्यात त्या देशाला भारतातून एशियाटिक लॉयन पाहिजे होते. भारताने ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने चर्चा पुन्हा ठप्प झाली. चित्त्यांच्या पुनर्प्रवेशासाठी मागील दशकात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानसह १२ राज्यांत अध्ययन करण्यात आले होते. २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टाने आफ्रिकी चित्ते आणण्यावर रोख लावली होती. २०२० मध्ये ती रोख हटविण्यात आली. त्यानंतर लगेच या योजनेवर काम सुरू झाले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवNarendra Modiनरेंद्र मोदी