भूस्खलनग्रस्त भागातून ७६ जवानांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 06:28 IST2025-06-08T06:27:54+5:302025-06-08T06:28:05+5:30

अतिवृष्टी व भूस्खलनामुळे चातेनचा संपर्क तुटल्याने या भागात अडकलेल्या किमान ७६ सुरक्षा जवानांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. जवानांची सुटका केल्यानंतर भूस्खलनग्रस्त भागातील स्थानिक नागरिक व सैन्य कर्मचाऱ्यांसाठी हेलिकॉप्टरने १,३०० किलो मदत साहित्य पाठविण्यात आले.

76 soldiers rescued from landslide-hit area | भूस्खलनग्रस्त भागातून ७६ जवानांची सुटका

भूस्खलनग्रस्त भागातून ७६ जवानांची सुटका

गंगटोक - अतिवृष्टी व भूस्खलनामुळे चातेनचा संपर्क तुटल्याने या भागात अडकलेल्या किमान ७६ सुरक्षा जवानांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. जवानांची सुटका केल्यानंतर भूस्खलनग्रस्त भागातील स्थानिक नागरिक व सैन्य कर्मचाऱ्यांसाठी हेलिकॉप्टरने १,३०० किलो मदत साहित्य पाठविण्यात आले.

जवानांना बाहेर काढल्यानंतर संयुक्तरीत्या सुरू केलेले अभियान शनिवारी थांबविण्यात आले. एमआय-१७ या हेलिकॉप्टरच्या मदतीने ७६ सुरक्षा जवानांना चातेन येथून पाकयोंग ग्रीनफील्ड विमानतळावर सोडण्यात आले. अतिवृष्टी व भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे उत्तर सिक्कीमसोबतचा संपर्क तुटला होता. यामुळे लाचेन, लाचुंग व चुंगथांग क्षेत्रात १,६००पेक्षा अधिक पर्यटक अनेक दिवस अडकून पडले होते. त्यानंतर सरकारने बचाव अभियान सुरू करत या सर्व पर्यटकांची सुटका केली.

Web Title: 76 soldiers rescued from landslide-hit area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.