75 लाखांमध्ये बेकायदा अमेरिकेला पाठविणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमध्ये ‘ईडी’ची २९ ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:13 PM2024-03-07T13:13:29+5:302024-03-07T13:14:18+5:30

महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात येथे ही छापेमारी झाली आहे. या छापेमारीदरम्यान ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दोन आलिशान गाड्या तसेच ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

75 Lakhs Exposed of Company Sending Illegally to America; ED raids at 29 locations in Maharashtra, Delhi, Gujarat | 75 लाखांमध्ये बेकायदा अमेरिकेला पाठविणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमध्ये ‘ईडी’ची २९ ठिकाणी छापेमारी

75 लाखांमध्ये बेकायदा अमेरिकेला पाठविणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमध्ये ‘ईडी’ची २९ ठिकाणी छापेमारी

मुंबई : सामान्य लोकांकडून पैसे उकळत त्यांना बेकायदा अमेरिका व कॅनडा येथे पाठविणाऱ्या टोळीशी निगडीत २९ ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात येथे ही छापेमारी झाली आहे. या छापेमारीदरम्यान ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दोन आलिशान गाड्या तसेच ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, बोगस कागदपत्रे तयार करत लोकांना अवैधरीत्या अमेरिका व कॅनडा येथे पाठविणाऱ्या एका टोळीचा गुजरात पोलिसांनी पर्दाफाश करत त्यांना अटक केली होती. तेथील पोलिसांनी या प्रकरणी एकूण तीन गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणातील पैशांची व्याप्ती व आंतरराष्ट्रीय संबंध लक्षात घेत ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास आता सुरू केला आहे. 

Web Title: 75 Lakhs Exposed of Company Sending Illegally to America; ED raids at 29 locations in Maharashtra, Delhi, Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.