शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 13:37 IST

जोपर्यंत ती चूक सुधारत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत.

नवी दिल्लीः पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच PM-Kisan योजना ही मोदी सरकारची महत्त्वाची योजना असून, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली. पण पंतप्रधान किसान योजनेंतर्गत एका चुकीमुळे 70 लाख शेतकर्‍यांना 2000 रुपये मिळालेले नाहीत. कोणालाही अंदाजही नव्हता की, शब्दांमधल्या एका चुकीमुळे शेतकऱ्याला दोन हजार रुपयांवर पाणी सोडावे लागेल. कागदावरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जवळपास 4200 कोटी रुपयांचा सहाय्यता निधी मिळालेला नाही. जोपर्यंत ती चूक सुधारत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत. कुठे झाली चूक?- पंतप्रधान किसान योजनेच्या अर्जदारांच्या नाव व बँक खाते क्रमांकामध्ये थोडा गोंधळ आहे. बँक खाती आणि इतर कागदपत्रांमध्ये नावाची स्पेलिंग वेगवेगळी आहे. ज्यामुळे योजनेच्या प्रणालीतून अशा शेतकऱ्यांना बाहेर करण्यात आलं आहे, म्हणजे त्यांना लाभ मिळालेला नाही. पंतप्रधान किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी न्यूज 18ला सांगितले की, 'अशा प्रकारची गडबड करणारे अर्जदार शेतकर्‍यांची संख्या सुमारे 70 लाखांच्या घरात आहे. तर जवळपास 60 लाख लोकांच्या आधार कार्डमध्ये गोंधळ आहे.पडताळणीसाठी प्रलंबित सव्वा कोटी  प्रकरणे : देशभरातील सुमारे 1.3 कोटी शेतकरी वार्षिक 6000 रुपयांच्या लाभापासून वंचित आहेत. असेही काही जिल्हे आहेत, जिथे सव्वा-सव्वा लाख शेतकऱ्यांची डेटा पडताळणीसाठी प्रलंबित आहे. जेव्हा राज्य सरकार शेतक-यांच्या तपशीलाची पडताळणी करून ते केंद्राकडे पाठवते, तेव्हा शेतक-याला पैसे मिळतात.चूक कशी दुरुस्त होईल?: सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्याच्या फार्मर कॉर्नरवर जा आणि तिथे Edit Aadhaar Details पर्यायावर क्लिक करा. आपल्याला आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. आपले नाव केवळ चुकीचे असल्यास म्हणजेच आपले नाव अप्लिकेशन आणि आधारवर भिन्न असल्यास ते ऑनलाइनपद्धतीनं दुरुस्त करून घ्या. इतर काही चूक असल्यास आपल्या लेखपाल व कृषी विभाग कार्यालयात संपर्क साधा.

हेही वाचा

धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा

देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्‍या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

मोठी बातमी! 'या' बँकांनी मिनिमम बॅलन्स अन् व्यवहाराचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा बसेल फटका

जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात.... 

ट्विटर हॅकर्स मागणी करणारे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजे नेमकं काय?

गुगलसोबत मिळून स्मार्टफोन बनवणार, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात, येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात होऊ शकते मोठी वाढ

CoronaVirus:लढ्याला यश! देशात Covaxinनंतर कोरोनावरच्या दुसऱ्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरू

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना