७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; कंटाळून इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 13:32 IST2025-04-20T13:31:03+5:302025-04-20T13:32:56+5:30
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका अभियंत्याने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.

७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; कंटाळून इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल
मागील काही दिवसापासून पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आले आहेत. आता आणखी एक असेच प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून पुन्हा एकदा पत्नीच्या छळाचे प्रकरण समोर आले आहे. तिथे पत्नीच्या छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले.
जॉली हॉटेलमधील एका खोलीत त्याचा मृतदेह सापडला. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो तरुण सांगत आहे की जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तेव्हा मी या जगात नसेन. जर पुरुषांसाठी कायदा असता तर कदाचित मी हे चुकीचे पाऊल उचलले नसते. माझ्या पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक छळ मी सहन करू शकलो नाही. म्हणूनच मी हे पाऊल उचलत आहे. बाबा, आई, मला माफ करा, असंही या व्हिडीओमध्ये सांगत आहे.
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो...
मोहित यादव एका सिमेंट कंपनीत फील्ड इंजिनिअर म्हणून काम करतो. तो औरैया जिल्ह्यातील दिबियापूरचा रहिवासी होता. काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने प्रिया यादव नावाच्या मुलीशी लग्न केले. आयुष्यात सगळं व्यवस्थित चाललं होतं. दरम्यान, प्रियाची बिहारमधील समस्तीपूर येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर प्रियाने रंग बदलण्यास सुरुवात केली आणि तिच्या आई आणि भावाच्या सांगण्यावरून तिचा पती मोहितला त्रास देऊ लागली. तिने माझ्यावर घर आणि जमीन तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.
आत्महत्या करण्यापूर्वी मोहितने एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्याने म्हटले होते की, माझी पत्नी प्रिया यादवच्या आईने माझ्या मुलाचा गर्भपात केला आहे आणि तिने दागिने आणि साड्या स्वतःकडे ठेवल्या आहेत. माझी पत्नी मला धमकी देत आहे की जर घर आणि मालमत्ता माझ्या नावावर हस्तांतरित केली नाही तर ती मला आणि माझ्या कुटुंबाला हुंड्याच्या खोट्या आरोपात अडकवेल. जर मी मानसिक छळाला कंटाळलो असेल आणि माझ्या मृत्यूनंतरही मला न्याय मिळाला नाही, तर माझी राख नाल्यात फेकून द्यावी. आई आणि बाबा, मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, असंही तो व्हिडीओमध्ये सांगत आहे.
सात वर्षानंतर लग्न केले
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, मृताचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृताचा कुटुंबीयांनी सांगितले की, माझा भाऊ मोहित नोएडा येथील एका सिमेंट कंपनीत काम करायचा. प्रिया नोएडामध्येच राहत होती. तिथून ते रिलेशनमध्ये आले. यानंतर, सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले. कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने हे लग्न झाले. लग्नानंतर तीन महिने सगळं ठीक होतं, त्यानंतर प्रियाने मला त्रास द्यायला सुरुवात केली. तिने मला माझ्या कुटुंबातील सदस्यांपासून वेगळे केले आणि नंतर माझ्यावर मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणू लागला नाहीतर ती माझ्यावर खोटा खटला दाखल करेल.
माझ्या भावाने आणि सासूने माझ्या भावाला आणि कुटुंबातील सदस्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. या दबावामुळे भावाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी भावाने रात्री एक व्हिडीओ बनवला आणि तो त्याच्या स्टेटसवर पोस्ट केला, असंही कुटुंबीयांनी सांगितले.