शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यांना भेटलेले ७ आमदार बसपातून निलंबित, उत्तर प्रदेशातील राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 07:12 IST

Uttar Pradesh Politics : बसपाच्या सात आमदारांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकारण ढवळून निघाले आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : बसपाच्या सात आमदारांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकारण ढवळून निघाले आहे. विधान परिषद निवडणुकीत सपाच्या उमेदवारांना हरविण्यासाठी बसपा पूर्ण ताकद लावेल आणि प्रसंगी भाजप व अन्य कोणत्याही विरोधी पक्षाला मत देण्याची वेळ आली तरी चालेल, अशा शब्दात बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सपाला इशारा दिला आहे. तथापि, मायावती यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मायावती यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, यानंतर काही शिल्लक राहिले आहे काय. मायावती यांच्या वक्तव्यावर टीका करताना सपाचे राष्ट्रीय सचिव  व प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी म्हटले आहे की, मायावती यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की, त्यांची भाजपसोबत हातमिळवणी आहे. ४०३ सदस्यीय विधानसभेत बसपाचे १८ आमदार असून, सात आमदारांनी बुधवारी राज्यसभा उमेदवार रामजी लाल गौतम यांना विरोध केला होता. त्यानंतर मायावती यांनी आपल्या पक्षातील सात आमदारांना निलंबित केले आहे. बहुजन समाज पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या सात आमदारांनी इतर कोणत्याही पक्षात जाण्याची आमची योजना नाही, असे गुरुवारी येथे म्हटले. पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी सात जणांना गुरुवारी निलंबित केले.  

भाजपचा राज्यसभा निवडणुकीत बसपा उमेदवाराला पाठिंबा उत्तर प्रदेशील राज्यसभेच्या रिक्त नऊ जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय डावपेच रचले जात असताना घडलेल्या आश्चर्यकारक घडामोडीअंती भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत मायावती यांच्यानेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रामजी गौतम यांना पाठिंबा देण्याचा फैसला केला. राज्यसभेच्या नवव्या जागेसाठी भाजपला स्वत:चा उमेदवार देता आला असता. कारण भाजपकडे २१ अतिरिक्त मते असून १६ मतांची गरज आहे. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या उमेदवाराला ३६ मते मिळणे जरुरी आहे. 

भाजपने ३१७ आमदारांच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणून ८ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. याशिवाय काँग्रेसचे ७, बसपाचे ५ आणि इतर अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची इच्छा आहे. तथापि, भाजपने नववा उमेदवार न देता समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांना शह देण्यासाठी बसपाची नाराजी दूर करण्याचा पर्याय निवडला. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देतील, या समजुतीने भाजपने यावेळी बसपाला राज्यसभेची जागा दिली. विधानसभेत ४७ आमदार असताना समाजवादी पार्टीने दुसरा उमेदवार का दिला, हेही आश्चर्यकारक आहे. बसपाची पूर्वी भाजपशी तीनदा आणि सपाशी दोनदा युती होती.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीPoliticsराजकारण