7 लाख कॅश, 7 तोळे सोनं, 5 मोबाईल...; पाकिस्तानातून काय-काय घेऊन आली सीमा हैदर? जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 20:55 IST2023-07-14T20:53:12+5:302023-07-14T20:55:31+5:30

Seema Haider Love Story : आपण सचिनसाठी पाकिस्तानातलं सर्वकाही सोडून भारतात आलो आहोत, असा दावा सीमाने केला होता. पण...

7 lakhs in cash, seven tolas of gold and five mobile phones know about What did Seema Haider carry from Pakistan | 7 लाख कॅश, 7 तोळे सोनं, 5 मोबाईल...; पाकिस्तानातून काय-काय घेऊन आली सीमा हैदर? जाणून थक्क व्हाल

7 लाख कॅश, 7 तोळे सोनं, 5 मोबाईल...; पाकिस्तानातून काय-काय घेऊन आली सीमा हैदर? जाणून थक्क व्हाल

आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातूनभारतात पळून आलेल्या सीमा हैदरची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानातही सीमा आणि सचिन चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांच्याशी संबंधित नव-नव्या स्टोरीज रोजच्या रोज समोर येत आहेत आणि लोकही त्यात रस घेत आहेत. सीमा भारतात पोहोचली तेव्हा तिच्यासोबत चार मुलंही होती. आपण सचिनसाठी पाकिस्तानातलं सर्वकाही सोडून भारतात आलो आहोत, असा दावा सीमाने केला होता. मात्र, आता तिच्या सासऱ्याने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सीमा भारतात काय-काय घेऊन आली? -
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सीमा हैदरचे सासरे मीर जान यांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, सीमा सात तोळे सोन्यासह पाकिस्तानातून पळून गेली आहे. एवढेच नाही, तर आपल्या मुलाने (सीमाचा एक्स पाकिस्तानी पती) सीमाला सात लाख रुपये पाठवले होते, हे पैसेही ती घेऊन गेली, असा दावाही त्यांनी केला आहे. इकडे, सीमाला पोलिसांनी पकडले असता तिच्याकडून पाच स्मार्टफोन जप्त करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, सीमाकडे तीन आधार कार्डदेखील आढळले आहेत. एक आधारकार्ड सीमाचे स्वतःचे आहे. तर उरलेले दोन प्रत्येकी तिचे वडील आणि पतीचे आहेत.

काय म्हणाली सीमा? -
यासंदर्भात बोलताना सीमा म्हणाली, मी सर्व दागिने गहाण ठेवून माझ्या पतीला परदेशात पाठवले होते. तसेच, पतीने पाठवलेल्या पैशातून आपण पाकिस्तानात एक घर खरेदी केले होते. एवढेच नाही, तर सचिनच्या प्रेमात पडल्यानंतर सीमाने भारतात येण्याचा विचार केला, तेव्हा तिने हे घर बारा लाख रुपयांना विकले. हेच पैसे वापरून ती पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात आली, असा दावा तिने केला आहे.

सीमा अशी आली आले भारतात -
खरे तर, सीमा विवाहित आहे. तिचा नवरा दुबईत काम करतो. त्याच्यापासून तिला 4 मुले आहेत. पण, सचिनच्या संपर्कात आल्यानंतर तिने पाकिस्तानातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी व्हिसा न मिळाल्याने, ती नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली आहे.

Web Title: 7 lakhs in cash, seven tolas of gold and five mobile phones know about What did Seema Haider carry from Pakistan