1 ऑक्टोबरला मोठ्या क्रांतीची सुरुवात होणार; मोदी 5G सेवा सुरु करणार, तयार आहात ना...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 15:28 IST2022-09-24T15:27:38+5:302022-09-24T15:28:08+5:30
5G Service in India: अनेक दिवसापासून चर्चेत असलेली 5G इंटरनेट सेवा आता १ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमात होणार आहे.

1 ऑक्टोबरला मोठ्या क्रांतीची सुरुवात होणार; मोदी 5G सेवा सुरु करणार, तयार आहात ना...?
नवी दिल्ली : अनेक दिवसापासून चर्चेत असलेली 5G इंटरनेट सेवा आता १ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील प्रगती मैदानावर केले जाणार आहे.
'इंडिया मोबाईल काँग्रेस'हा कार्यक्रम चार ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच असल्याचा दावा करून, इंडिया मोबाइल काँग्रेस हे दूरसंचार विभाग आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे.
'सरकारने अल्प कालावधीत देशात 5G दूरसंचार सेवांचे ८० टक्के कव्हरेज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात या संदर्भात माहिती दिली. पहिल्या टप्प्यात, 5G दूरसंचार सेवा देशभरातील सुमारे १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती
5G वापरकर्त्यांना 4G पेक्षा १० पट जास्त इंटरनेट स्पीड मिळणार आहे. '5G सेवेद्वारे निर्माण होणाऱ्या रेडिएशनची पातळी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी आहे, असंही मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.