POKहून विस्थापित झालेल्या 5300 कुटुंबीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, मिळणार 5.5 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 04:03 PM2019-10-09T16:03:12+5:302019-10-09T16:04:02+5:30

मोदी सरकारनं पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे.

5300 families displaced by POK will receive big gift of Modi government, Rs 5.5 lakh | POKहून विस्थापित झालेल्या 5300 कुटुंबीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, मिळणार 5.5 लाख रुपये

POKहून विस्थापित झालेल्या 5300 कुटुंबीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, मिळणार 5.5 लाख रुपये

Next

नवी दिल्लीः मोदी सरकारनं पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. सरकारनं 5300 कुटुंबीयांना 5.5 लाख रुपये मदतनिधी देण्याचं जाहीर केलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी सांगितलं की, यामुळे विस्थापित कुटुंबीयांना न्याय मिळणार आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील 5300 विस्थापित कुटुंब जम्मू-काश्मीरशिवाय इतर क्षेत्रात वास्तव्याला आलेले आहेत. अशा कुटुंबीयांना मोदी सरकार 5.5 लाख रुपये मदतीच्या स्वरूपात देणार आहे.

केंद्र सरकारनं आशा कार्यकर्त्यांना गुड न्यूज दिली आहे. आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात केंद्रानं दुप्पट वाढ केली आहे. पहिल्यांदा त्यांना हजार रुपये मानधन मिळत होतं, त्याऐवजी आता त्यांना 2 हजार रुपये मानधन मिळणार आहे. आशा कार्यकर्त्या या प्रामुख्यानं महिला असतात, त्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याची सुविधा पुरवितात. हा भत्ता जुलै 2019पासून लागू झाला असून, लवकरच तो त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. याआधी महागाई भत्त्यात केवळ 2 ते 3 टक्क्यांनी वाढ व्हायची. मात्र मोदी सरकारनं महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवल्याचं जावडेकर म्हणाले. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 12 टक्के महागाई भत्ता मिळतो. आता तो 17 टक्क्यांवर गेला आहे.

Web Title: 5300 families displaced by POK will receive big gift of Modi government, Rs 5.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.