मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:55 IST2025-12-01T14:54:07+5:302025-12-01T14:55:34+5:30
मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील बरेली तहसीलमधील नयागाव पूल अचानक कोसळला. हा पूल ५० वर्षे जुना होता.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील बरेली तहसीलमधील नयागाव पूल अचानक कोसळला. हा पूल ५० वर्षे जुना होता आणि अनेक वर्षांपासून तो खराब झाला होता. या दुर्घटनेत दहा जण जखमी झाले आहेत, त्यापैकी एका तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी भोपाळ येथे रेफर करण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार, बरेली-पिपरिया राज्य महामार्गावरील नयागाव पूल सोमवारी सकाळी अचानक कोसळला. बाईकसह चार जण पुलावरून पडले. यामध्ये एकूण १० जण जखमी झाले आहेत, ज्यात पुलाखाली काम करणाऱ्या ८ कामगारांचा समावेश आहे. एका गंभीर जखमी तरुणाला तात्काळ भोपाळ येथे रेफर करण्यात आलं आहे. उर्वरित लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकही घटनास्थळी रवाना झाले आहेत. अपघाताचं मुख्य कारण खराब झालेल्या पुलावरील दुरुस्तीतील मोठा निष्काळजीपणा मानला जात आहे. ५० वर्षे जुना असलेला हा पूल अनेक वर्षांपासून खराब झाला होता.
मध्य प्रदेश रस्ते विकास महामंडळ (एमपीआरडीसी) या बांधकाम संस्थेने खराब झालेल्या पुलाची पुनर्बांधणी करण्याऐवजी फक्त नवीन रस्ता केल्याचा आरोप आहे. याच दरम्यान पुलाखाली सेंटिंग बसवून काम सुरू होतं, ज्यामुळे पूल कोसळण्याचं म्हटलं जातं. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.