शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

 मुस्लिम गुन्हेगारी प्रवृत्तीचे; देशातल्या 50 टक्के पोलिसांची धारणा- रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 12:37 PM

देशातल्या 50 टक्के पोलिसांना वाटतं की, मुसलमान हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात.

नवी दिल्लीः देशातल्या 50 टक्के पोलिसांना वाटतं की, मुसलमान हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. 'स्टेटस ऑफ पोलिसिंग इन इंडिया रिपोर्ट 2019'मध्ये असा दावा करण्यात आला आहे. सर्वेक्षणादरम्यान 35 टक्के पोलिसांनी सांगितलं की, गोहत्येच्या प्रकरणात कथित आरोपीला जमावानं मारणं हे स्वाभाविक आहे. तर दुसरीकडे 43 टक्के पोलिसांना वाटतं की, एखाद्या आरोपीला जमावानं चोप देणं यात चुकीचं काहीच नाही. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांनी एनजीओ कॉमन कॉज अँड सेंटर ऑफ द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटीच्या लोकनीती कार्यक्रमाद्वारे तयार करण्यात आलेला हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.देशातल्या 21 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं असून, पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या 12 हजार पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या 11000 कुटुंबीयांच्या मतांची दखल घेण्यात आली आहे. सर्वेक्षणात 37 टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना वाटतं, की किरकोळ गुन्ह्यांसाठी न्यायालयात हजर करण्याऐवजी पोलिसांकडेच एखादी छोटीशी शिक्षा सुनावण्याचा अधिकार देण्यात आला पाहिजे. तर 72 टक्के पोलिसांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची चौकशी करण्याच्या प्रकरणात राजकीय दबावाचा अनुभव आला आहे. सर्वेक्षणानुसार, देशातले पोलीस दररोज सरासरी 14 तास काम करत आहेत. तर 80 टक्के पोलीस अधिकारी आठ तासांहून अधिक वेळ कर्तव्य बजावतात. देशातले 50 टक्के पोलीस ओव्हरटाइम करतात. 

  • एससी-एसटी ऍक्टअंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे

एससी-एसटी ऍक्टअंतर्गत दाखल करण्यात आलेले जास्त करून गुन्हे हे खोटे आहेत. काही जण विशिष्ट हेतूने असे गुन्हा दाखल करून कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Policeपोलिस