शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मोबाइलमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी आढळल्यास ५ वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 2:43 AM

मुलांच्या सुरक्षेशी संबंधित पॉक्सो कायद्यात केंद्र सरकार दुरुस्ती करणार आहे. त्यानुसार प्रथमच मोबाइल, कॉम्प्युटर किंवा पुस्तक रूपाने मुलांशी संबंधित चाइल्ड पोर्नोग्राफी आढळून आल्यास पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद होईल.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : मुलांच्या सुरक्षेशी संबंधित पॉक्सो कायद्यात केंद्र सरकार दुरुस्ती करणार आहे. त्यानुसार प्रथमच मोबाइल, कॉम्प्युटर किंवा पुस्तक रूपाने मुलांशी संबंधित चाइल्ड पोर्नोग्राफी आढळून आल्यास पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद होईल.अनेक जण लोक मोबाइल वा कॉम्प्युटरमध्ये लहान मुलांशी संबंधित पोर्नोग्राफिक व्हिडीओ स्टोअर करतात. पोलीस किंवा तपास यंत्रणांनी चौकशी केल्यास मला कोणीतरी मेल-व्हॉटसअ‍ॅप केला होता. मी तो पाहिला वा पाठवला नाही, असे ते सांगतात. अनेकदा अशी पुस्तकेही जवळ बाळगतात व अमक्याने ते मला दिले, असे सांगतात.सध्या मुलांवर झालेला लैंगिक अत्याचार वा लैंगिक छळ पॉक्सो कायद्यात समाविष्ट आहे. पोर्नोग्रॉफीत मुलांना सहभागी करून घेणाऱ्यांनाही शिक्षेची तरतूद आहे. परंतु, मोबाइल, कॉम्प्युटर इतर इलेक्ट्रॉनिक किंवा इतर प्रकारच्या उपकरणांत ते बाळगण्यास बंदी असल्याचा स्पष्ट उल्लेख या कायद्यामध्ये नाही. आता मात्र केंद्र सरकार कायद्याद्वारे अशी कठोर तरतूद करणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल