4 मुलांची आई असलेली 48 वर्षीय महिला 24 वर्षांच्या प्रियकरासह गेली पळून; नवरा म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 03:03 PM2023-03-05T15:03:10+5:302023-03-05T15:04:51+5:30

महिलेला 4 मुले देखील आहेत ज्यात दोन मुली विवाहित आहेत.

48 year old woman eloped with 24 year old boyfriend mother of 4 children | 4 मुलांची आई असलेली 48 वर्षीय महिला 24 वर्षांच्या प्रियकरासह गेली पळून; नवरा म्हणतो...

4 मुलांची आई असलेली 48 वर्षीय महिला 24 वर्षांच्या प्रियकरासह गेली पळून; नवरा म्हणतो...

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या कोलारस पोलीस स्टेशन हद्दीतील बेरसिया गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. 48 वर्षीय महिला तिच्या 24 वर्षीय प्रियकरासह पळून गेली. महिलेला 4 मुले देखील आहेत ज्यात दोन मुली विवाहित आहेत. महिलेच्या पतीने सांगितले की, याआधीही ही महिला तरुणासोबत पळून गेली होती, त्यानंतर ती परत आली, ज्याची तक्रार कोलारस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

महिलेचा लवकरात लवकर शोध घेण्याची विनंती असहाय पतीने पोलिसांना केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेरासिया गावातील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी भदौता गावातील २४ वर्षीय तरुणासोबत पळून गेली आहे. याआधीही ती त्याच्यासोबत पळून गेली होती, 

मी तक्रार करेल या भीतीने ती परत आली. प्रियकराच्या नातेवाईकांनी तक्रारीच्या भीतीने महिलेला परत पाठवले होते. यानंतर तीन दिवसांपूर्वी ही महिला दुसऱ्यांदा तरुणासोबत पळून गेली. ज्याची तक्रार आज तीन दिवसांनी कोलारस पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

प्रियकरासोबत पळून गेलेल्या या 48 वर्षीय महिलेचा नवरा एका पायाने अपंग आहे. महिलेला 4 मुले असून त्यापैकी दोन मुलींचे लग्न झाले आहे. यानंतर तो आपल्या मुलासाठी मुलगी शोधत होता. मात्र दरम्यान ही महिला तिच्या प्रियकरासह पळून गेली. दुसरीकडे कोलारस पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून महिलेचा शोध सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 48 year old woman eloped with 24 year old boyfriend mother of 4 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.