शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील 45 टक्के वकील बोगस

By admin | Updated: January 23, 2017 13:11 IST

बार कौंसिल ऑफ इंडियाच्या दोन वर्ष जुन्या सभासदांच्या पदवीची पडताळणी केल्यास भारतातील 45 टक्के वकील बोगस असून ते बनावट पदवीच्या साहाय्याने प्रॅक्‍टिस करत असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - बार कौंसिल ऑफ इंडियाच्या दोन वर्ष जुन्या सभासदांच्या पदवीची पडताळणी केल्यास भारतातील 45 टक्के वकील बोगस असून ते बनावट पदवीच्या साहाय्याने प्रॅक्‍टिस करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात बार कौंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी भारताचे मुख्य मुख्य न्यायमूर्ती जे.एस खेहर व अन्य एका न्यायधिशांसमोर वकीलांच्या पदवीवर सुरु असलेल्या पडताळणी मध्ये देशात 55-60 टक्के वकील हे खरे आहेत अशी माहिती दिली आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जस्टिस जेएस खेहर यांना सम्मानित करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मनन कुमार मिश्रा वकील आणि न्यमुर्तीसमोर बोगस वकीलांची माहिती दिली आहे. बार कौंसिल ऑफ इंडियाच्या 2012 मधील निवडणुकींच्या आकडेवारीनुसार आपल्याजवळ 14 लाख वोटर्स वकील होते, पण पडतळणीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर फक्त 6.5 लाख वकीलांची नोंद झाली. मिश्रा पुढे म्हणाले, प्रक्टीस करत असलेल्या सर्व वकिलांच्या पदवीची पडताळणी केली असता 45 टक्के पदव्या ह्या बनावट असल्याचे समोर आले. मिश्रा म्हणाले, देशात 30 टक्के वकील बोगस आहेत. जे चुकीच्या पद्धतीने वकिलीची बोगस पदवी मिळवून प्रॅक्टीस करत आहेत. तर 15 टक्के वकिलांकडे अधिकृत पदवीच नाही.

या गैरप्रकाराबाबत बार कौंसिल पुढाकार घेणार असून नोंद असलेला प्रत्येक वकील खरोखरीच प्रॅक्‍टिस करतो का हे पाहण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस वकीलांवर कठोर कारवाई करण्याबाबत लवकरच पुढाकार घेऊन कायद्यातच तशी तरतूद करण्याबाबत बार कौंसिल ऑफ इंडियाचे प्रयत्न सुरू असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.