शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

४४० महिलांना जननी सुरक्षाचे कवच

By admin | Updated: May 23, 2014 00:46 IST

नाशिक : प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांना सुरक्षित प्रसूतीबरोबरच अन्य उपचार आणि अन्य कारणांसाठी महापालिकेने जननी सुरक्षा योजनेचे कवच दिले असून, त्याअंतर्गत ४४० महिलांनी लाभ घेतला आहे. याशिवाय जननी शिशू सुरक्षा योजनेचीही अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नाशिक : प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांना सुरक्षित प्रसूतीबरोबरच अन्य उपचार आणि अन्य कारणांसाठी महापालिकेने जननी सुरक्षा योजनेचे कवच दिले असून, त्याअंतर्गत ४४० महिलांनी लाभ घेतला आहे. याशिवाय जननी शिशू सुरक्षा योजनेचीही अंमलबजावणी करण्यात येत आहे.महापालिकेच्या प्रसूतिगृहातच किंवा रुग्णालयातच सुरक्षित प्रसूती झाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जननी सुरक्षा योजना चार वर्षांपूर्वी अंमलात आणण्यात आली. महापालिकेच्या प्रसूतीगृहात प्रसूत होणार्‍या महिलेस ६६० रुपये उपचार आणि अन्य कारणांसाठी दिले जातात. वर्षभरात या योजनेचा ४४० महिलांनी लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे घरी प्रसूत झालेल्या महिलेस उपचारासाठी पाचशे रुपये दिले जातात. त्याचादेखील एका महिलेने लाभ घेतला आहे. त्यामुळे लाभार्थींवर एकूण दोन लाख ६४ हजार ५०० रुपये खर्च करण्यात आले आहेत. योजनेतील अर्जांची छपाई तसेच इतर स्टेशनरी खर्चाचा विचार केला तर एकूण तीन लाख पाच हजार ४९१ रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिली. या योजनेप्रमाणेच शासनाच्या जननी शिशू सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या योजनेअंतर्गत महापालिकेच्या प्रसूतिगृहात दाखल होणार्‍या महिलेचा आणि नवजात शिशूचा संपूर्ण खर्च महापालिका करते. प्रसूत झालेल्या महिलेला तिच्या घरापर्यंत रुग्णवाहिकेतून पोहोचवण्याची व्यवस्था आहे. मनपाच्या प्रसूतिगृहात दाखल महिला शासनाच्या विशेष रुग्णवाहिका सेवेसाठी असलेल्या दूरध्वनी क्रमांक १०८ चा फायदा घेतात; परंतु महापालिकेला विनंती केल्यास रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते.